योगी सरकारमधील मंत्री आणि माजी क्रिकेटर चेतन चोहान यांचं निधन, ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आल्यानंतर दाखल झाले होते रूग्णालयात

वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील योगी सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि माजी क्रिकेटर चेतन चौहान यांचं निधन झालं आहे. कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, त्यांची किडनी फेल झाल्यानं त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आलं होतं.

गुडगांवच्या मेतांदा हॉस्पीटलमध्ये त्यांच्यावर उपचार चालू होते. उपचारादरम्यानच चेतन चौहान यांचा मृत्यू झाला आहे. भारतीय क्रिकेटसाठी देखील त्यांनी मोठं योगदान दिलेलं आहे.