बंगालमध्ये योगींच्या जाहीर सभेला परवानगी नाकारली

कोलकत्ता : पश्चिम बंगाल वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपचे फायर ब्रँड नेते योगी आदित्यनाथ आज रविवारी पश्चिम बंगालच्या बालुरघाट या ठिकाणी एका जाहीर सभेला संबंधित करण्यासाठी जाणार होते. मात्र ममता सरकारने योगींच्या हेलिकॉप्टर लँडिंगसाठी परवानगी दिली नाही. त्याच प्रमाणे योगींच्या जाहीर सभेला हि परवानगी नाकारली आहे. पश्चिम बंगाल सरकारने योगींच्या जाहीर सभेची परवानगी कोणतीही पूर्व कल्पना दिल्या शिवाय नाकारली आहे असे उत्तर प्रदेश मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

योगी आदित्यनाथ पश्चिम बंगाल मध्ये जाऊन चार ठिकाणी जाहीर सभा घेणार होते त्यापैकी दोन सभा आज रविवारी होणार होत्या. त्या जाहीर सभा पुरुलिया आणि बांकुरा या ठिकाणी होणार होत्या. तर उर्वरित दोन जाहीर सभा ५ तारखेला रायगंज आणि दिनाजपूर या दोन जिल्ह्यात होणार होत्या. मात्र योगी आदित्यनाथ यांच्या चारी सभांची परवानगी ममता सरकारने नाकारली आहे.

नरेंद्र मोदी यांच्या काल शनिवारी पश्चिम बंगाल या राज्यात रेकॉर्ड ब्रेक सभा झाल्या नंतर ममता बॅनर्जी यांना त्यांच्या पराभवाची चिंता वाटू लागली म्हणून त्यांनी या सभांना परवानग्या दिल्या नाहीत अशी टीका देखील भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. मागच्या काही दिवसापूर्वी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा मालदा येथील रॅली वरून हि वाद झाला होता.