UP Election | काँग्रेसचा नवा फॉर्म्युला ! तिकिट हवं असेल तर 11 हजार रुपये अन् ‘या’ 7 प्रश्नांची द्या उत्तरं

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणूका (UP Election) पुढील वर्षी होणार आहे. त्यासाठी आतापासून राजकीय वातावरण ढवळून निघण्यास सुरूवात झाली आहे. शिवसेनेने १०० जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय कुमार लल्लू यांंनी एक पत्रक जारी केले आहे. त्यामध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक (UP Election) असणाऱ्या उमेदवारांनी अर्जासोबत ११ हजार रुपये जमा करण्याची सूचना केली आहे. दरम्यान, हे पैसे पक्षासाठी योगदान म्हणून जमा केले जातील असे सांगण्यात आले आहे.

निवडणूकीतील इच्छुक उमेदवारांसाठी काँग्रेसने एक निर्धारित फॉर्मेट निश्चित केला आहे. या फॉर्मच्या माध्यमातून उमेदवाराला निवडणूक कमिटीकडे अर्ज दाखल करावा लागेल. काँग्रेसने स्थानिक पातळीवर अशा कमिटी बनवल्या आहेत. या कमिट्यांमध्ये न्याय पंचायत आणि ग्रामपंचायत अध्यक्षांचा समावेश आहे. उमेदवाराबाबत पुरेशी माहिती गोळा करुन संशोधन करण्याचे काम ही कमिटी करेल. आणि त्याचा अहवाल निवडणूक कमिटीकडे सोपवेल.

केवळ २ लोकांची नावं हायकमांडकडे जातील

स्थानिक कमिट्यांनी निवडणूक कमिटीकडे दिलेल्या अहवालात १० इच्छुक उमेदवारांचा समावेश असले. त्यापैकी निवडणूक कमिटी दोन नावांवर शिक्कामोर्तब करून ही नावे काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्याकडे सुपूर्द करण्यात येतील. त्यानंतर प्रियंका गांधी काँग्रेसचा उमेदवार म्हणून एकाचे नाव घोषित करतील.

 

फॉर्ममध्ये कोणते प्रश्न विचारले जाणार?

काँग्रेसमधील इच्छुकांना जो फॉर्म भरण्यास दिला आहे. त्यामध्ये तुमचा राजकीय अनुभव काय आहे? तुम्ही किती वर्ष काँग्रेस पक्षासाठी काम करत आहात? तुमची पात्रता काय? काँग्रेसच्या धोरणांबद्दल आपल्याला किती माहिती आहे? तुमच्या मतदारसंघात तुमची ओळख कशी आहे? तुमच्यावर कुठले गुन्हेगारी पार्श्वभूमीचे खटले नोंद आहेत का? त्याशिवाय तुम्हाला काँग्रेसचा उमेदवार का बनवावं? आदी प्रश्नांवर थोडक्यात माहिती देण्यास सांगितले आहे.

 

Web Title : UP Election | election if you want be candidate give 11 thousand appeal aspirants congress

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Dr. Narendra Dabholkar Murder Case | अखेर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील 5 आरोपींवर आज आरोप निश्चित; ‘त्यांना’ मात्र गुन्हा कबूल नाही

OLA Electric Scooter New Price | ओलाच्या ‘ई-स्कुटर’च्या किमतीत कपात; ऑक्टोबरपासून रस्त्यावर धावणार

MP Supriya Sule | ‘या’ आयपीएस अधिकार्‍यानं घेतली खासदार सुप्रिया सुळेंची भेट