UP Gang Rape Case | सामूहिक बलात्कार प्रकरण ! माजी आमदाराच्या मुलाला पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीतून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – उत्तर प्रदेशात एका तरुणीवर सामूहिक बलात्कार (UP Gang Rape Case) केल्याची घटना गेल्या वर्षी घडली होती. या प्रकरणातील आरोपी पोलिसांना (UP Police) वर्षभरापासून गुंगारा देत होता. अखेर या आरोपीच्या पुण्यात (Pune Police) मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी हा समाजवादी पक्षाच्या माजी आमदाराचा (Former MLA Samajwadi Party) मुलगा असून सामूहिक बलात्कार प्रकरणात उत्तर प्रदेश पोलीस (UP Gang Rape Case) त्याच्या मागावर होते. त्याची माहिती देणाऱ्यास एक लाखाचे बक्षीस उत्तर प्रदेश पोलिसांनी जाहीर केले होते. आरोपी हडपसर (Hadapsar) परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत (Elite Society) राहत होता.

 

विष्णू विजय मिश्रा Vishnu Vijay Mishra (वय – 34) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. विष्णू याचे वडील विजय मिश्रा हे उत्तर प्रदेशातील भदोईचे आमदार होते. सामूहिक बलात्कार प्रकरणात (UP Gang Rape Case) मिश्रा सहभागी असल्याचे तपासात समोर आले होते. त्यानंतर तो फरार झाला होता. उत्तर प्रदेश पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात असताना त्याचे नातेवाईक पुण्यात राहत असल्याची माहिती विशेष तपास पथकाला मिळाली. त्यानुसार दहा दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश पोलिसांचे एक पथक पुण्यात दाखल झाले होते.

आरोपीचा शोध घेत असताना तो हडपसर पोलीस ठाण्याच्या (Hadapsar Police Station) हद्दीतील एका उच्चभ्रू सोसायटीत राहत असल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर हडपसर पोलिसांच्या मदतीने विशेष तपास पथकाने मिश्राला अटक केली.
त्याला लष्कर न्यायालयात (Lashkar Court) हजर करण्यात आले.
कोर्टाने त्याला प्रवासी कोठडी (ट्रान्झिट रिमांड – Transit Remand) दिली. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलीस आरोपीला घेऊन गेले.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta)
यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे (Senior Police Inspector Arvind Gokule),
पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे (PSI Avinash Shinde),
निखील पवार, भगवान हंबर्डे, सोनवणे तसेच वाराणसी पोलिसांच्या विशेष पथकातील (Varanasi Police Special Squad)
सहायक पोलीस आयुक्त शैलेश सिंग (ACP Shailesh Singh), पोलीस निरीक्षक श्रीवास्तव (Police Inspector Srivastava),
पोलीस उपनिरीक्षक अंगद यादव (PSI Angad Yadav), हवालदार राहुल सिंग यांनी ही कारवाई केली.

 

Web Title :- UP Gang Rape Case | former mla son arrested from pune in uttar pradesh gang rape case pune police hadapsar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा