‘खाकी’ वर्दीवाल्याची फसवणूक ! ASP बनुन ‘त्या’ भामटयानं ‘चक्‍क’ पोलिस अधिकार्‍याला लावला ‘चूना’

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधील गोरखपूरमध्ये फसवणुकीचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथील एका पोलीस उपनिरीक्षकच एका ठगाचा शिकार झाला. एका धूर्त चोराने स्वतः सहाय्य्क पोलीस अधीक्षक असल्याची बतावणी करून सब इंस्पेक्टर ला हजारो रुपयांचा गंडा घातला. जेव्हा फसवले जाण्याची कुणकुण अधिकाऱ्याला लागली तोपर्यंत आरोपी पसार झाला होता.

अशी घडली घटना :

फसवल्या गेलेला सब इन्स्पेक्टर झंगहा पोलीस ठाण्यात अधिकारी पदावर नियुक्त आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी त्यांच्या मोबाईल वर एक फोन आला ज्यावर समोरील व्यक्तीने आपण एडिशनल एसपी असल्याचे सांगितले. त्याचा रुबाब आणि आवाज पाहून अधिकाऱ्याचाही त्यावर सहज विश्वास बसला.

समोरील व्यक्तीने अधिकाऱ्याला २० हजार रुपयांची रक्कम घेऊन यायला सांगितले. सब इन्स्पेक्टर तात्काळ याठिकाणी पोहोचला तेव्हा तोतया सहाय्य्क पोलीस अधीक्षक एका कारमध्ये त्याची वाट पाहात बसला होता. कारमध्ये मागच्या सीटवर बसलेल्या या आरोपीने उपनिरीक्षकाच्या कामकाजाचे कौतुक करत त्याच्याकडून २० हजार रुपये घेतले आणि पोबारा केला. हे सगळे इतके गडबडीत झाले की उपनिरीक्षकाला कळलेच नाही. काही वेळाने आपण केलेली चूक लक्षात आली मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

यानंतर या अधिकाऱ्याने तात्काळ पिपराइच पोलीस ठाण्याच्या प्रभारी निरीक्षकांना फोन करून घडलेली घटना सांगितली. यानंतर निरीक्षकांनी आरोपीला पकडण्यासाठी नाकाबंदी केली मात्र पोलिसांना केवळ ती कार सापडली, आरोपी मात्र त्यामध्ये नव्हता. पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने आपली कार कोणीतरी भाड्याने घेतल्याचे आणि उपनिरीक्षकाची भेट झाल्यावर आरोपी गाडीतून निघून गेल्याचे त्याने सांगितले. या घटनेची चर्चा सर्वत्र होत असून पोलीस मात्र यासंदर्भात कोणतीही अधिकची माहिती द्यायला नकार देत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त