भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी तत्कालीन पोलिस अधीक्षकांच्या (SP) विभागीय चौकशीचे आदेश

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधील बस्ती येथे भाजप नेते कबीर तिवारी यांच्या हत्येप्रकरणी तत्कालीन पोलीस अधीक्षक (SP) पंकज कुमार यांच्याविरूद्ध विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 9 ऑक्टोबर रोजी झालेल्या तिवारी यांच्या खूनाच्या तपासात हलगर्जीपणा केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांचाकडून बस्ती पोलीस स्टेशनमधील चार्ज काढून घेतला आहे.

यूपी प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, पंकज कुमार यांनी कामात हलगर्जीपणा दाखविला आहे, त्याशिवाय तपासकार्यात त्यांनी प्रभावी कारवाई केली नाही. या घटनेशी संबंधित त्यांचे दुर्लक्ष दिसून येते. त्यामुळे अखिल भारतीय सेवा (आचरण) नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्याविरूद्ध विभागीय कार्यवाही केली जाईल.

9 ऑक्टोबर रोजी झाला होता खून –

9 ऑक्टोबर रोजी एपीएन पीजी कॉलेज जवळ अज्ञात हल्लेखोरांनी कबीर तिवारी यांना भर दिवसा गोळ्या घातल्या. नंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची खबर शहरात पसरताच त्यांचे समर्थक हिंसाचाराकडे वळले. या लोकांनी यूपी रस्त्यावरच्या बसेसची तोडफोड केली आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान केले होते.

Visit : policenama.com

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी

You might also like