मुख्यमंत्री आदित्यनाथांचा फोन न उचलणारे 25 कलेक्टर अन् 4 आयुक्त गोत्यात, सरकारनं उचललं ‘हे’ पाऊल

लखनऊ : पोलीसनामा ऑनलाईन – उत्तर प्रदेशचे पॉवरफुल मुख्यमंत्री असलेल्या योगी आदित्यनाथ यांचा जिल्हाधिकारी, आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि एसएसपीही फोन उचलत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांचा फोन न उचलणाऱ्या या सरकारी बाबूंना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहेे.

जिल्हाधिकारी आणि कमिश्नर सरकारी फोन उचलत नसल्याच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांकडे वारंवार येत होत्या. त्यामुळे अखेर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आपल्यासमोरच सर्वांना फोन लावण्यास सांगितले. त्यावेळी त्यातील अनेकांनी फोनच उचलला नाही. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची खात्री पटली आणि त्यांनी संबंधितांना नोटीस पाठवण्याचे आदेश जारी केले. मुख्यमंत्र्यांचा फोन उचलत नसल्याबद्दल प्रशासनाने 25 जिल्हाधिका-यांना आणि 4 कमिश्नर यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली असून 3 दिवसात त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले आहे. वाराणसी, प्रयागराज, अयोध्या आणि बरेलीच्या कमिश्नरला या नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत.