धक्कादायक ! युवकाच्या कडेवर निरागस मुलगी असतानाही पोलिसांचा लाठीचार्ज, फोटो व्हायरल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एक निरागस मुलगी एखाद्या व्यक्तीच्या कडेवर असते. त्या व्यक्तीच्या हातात हेल्मेट असते. त्याच्या समोर दोन पोलिस उभे आहेत. दोन्ही पोलिसांच्या हातात काठ्या आहेत आणि एका पोलिसाने त्या मुलीवर आपली काठी उचलली आहे. असा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून यावरून लोक उत्तर प्रदेश पोलिसांवर अनेक प्रश्न उपस्थित करीत आहेत.

समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दिग्विजय सिंह यांनी ट्विटरवर हा फोटो शेअर केला आहे. सिंग यांनी लिहिले- ‘जेव्हा जगात ‘डॉटर्स डे’ साजरा केला जात होता, तेव्हा उत्तर प्रदेशात योगी सरकार कडेवर मुलगी असलेल्या वडिलांना लाठ्यांनी मारहाण करीत होते. ही पहिलीच वेळ नाही ! नवरात्रातच बीएचयूच्या विद्यार्थ्यांना २ वर्षांपूर्वी जाहीरपणे मारहाण केली गेली. हे योगी सरकारचे रामराज नाही तर #जंगलराज आहे !!

त्याचबरोबर समाजवादी पक्षाचे माजी आमदार अविनाश कुशवाह यांनीही हा फोटो शेअर केला आहे. त्यांनी लिहिले- ‘हे लखनौच्या हुसैनगंजचे एक चित्र आहे ज्यात एका व्यक्ती दिसत आहे ज्याच्या एका हातात त्याची घाबरलेली मुलगी आहे, आणि दुसर्‍या हाताने तिला पोलिसांच्या लाठीपासून वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. यामध्ये एक पोलीस काठी घेऊन उभा आहे आणि दुसरा सैनिक त्या व्यक्तीला धक्का देत आहे.

शागुफ्ता हसन सय्यद या फेसबुक वापरकर्त्याने हा फोटो शेअर केला आहे आणि लिहिले आहे – ‘हा फोटो, ज्यामध्ये एका हातात घाबरलेल्या मुलीला घेऊन एक व्यक्ती उभा आहे आणि तो जो दुसऱ्या हाताने मुलीला पोलिसांच्या काठीपासून वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे, एक पोलीस लाठी उगारत आहे आणि दुसरा धक्का देत आहे. उत्तर प्रदेश पोलिसांचे हे चित्र आपण कोणत्या परिस्थितीत जगत आहोत हे दर्शवित आहे.’

वास्तविक, हे चित्र २२ सप्टेंबर २०१९ चे आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, रविवारी लखनौमधील हुसैनगंजच्या महाराणा प्रताप चौकाजवळ पोलिस वाहने तपासत होते. दुचाकीच्या तपासणी दरम्यान गोंधळ उडाला. एका दुचाकीस्वाराच्या बहिणीने असा आरोप केला की पोलिसांनी तिला चोप दिला. त्याच्या कुटुंबीयांनी आणि स्थानिक लोकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. यानंतर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यावेळी हा फोटो काढला गेला आहे.

Visit : policenama.com