UP मध्ये थरार ! भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या

फिरोजाबाद (उत्तर प्रदेश) : फिरोजाबाद येथे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पूर्ववैमन्यातून हा हल्ला झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. गोळीबारानंतर हल्लेखोर फरार झाले आहेत. डी.के. गुप्ता असे या भाजप नेत्याचे नाव आहे. ते भाजपच्या फिरोदाबाद विभागाचे उपाध्यक्ष होते. काल (शुक्रवारी) मध्यरात्री हा प्रकार घडला. हल्लेखोऱ्याना शोधण्यासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत.

रात्री आपले दुकान बंद करून डी.के. गुप्ता हे घराकडे निघाले होते. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या तीन जण आले. त्यांनी गुप्ता यांना रस्त्यात अडविले. अचानक गुप्ता त्यांच्यावर त्या अज्ञात हल्लेखोऱांनी गोळीबार केला. यात ते गुप्ता हे गंभीर जखमी झाले होते . त्यांना उपचारासाठी त्यांना एका रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, असल्याचे डॅाक्टरांनी सांगितले. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

फिरोजाबाद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिक्षक सचिंद्र पटेल म्हणाले की पूर्ववैमन्यातून हा हल्ला झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. डी.के. गुप्ता आणि मारेकरी याच्यात वाद होते. यातून ही हत्या झाली असावी, असा आरोप गुप्ता यांच्या नातेवाईकांनी केला आहे. नातेवाईकांनी काही संशयीतांची नावे सांगितली आहेत. गुन्हेगारांना लवकरच पकडण्यात येईल.