UP News | लखनऊच्या काकोरीमध्ये ATS चे मोठे ऑपरेशन, अल कायदाच्या 2 दहशतवाद्यांना पकडल्याचा दावा

लखनऊ : राजधानी लखनऊ (Lucknow) च्या काकोरी (Kakori) परिसरात एटीएस (ATS) ने संशयाच्या आधारावर एका घराला घेराव घातला आहे. सोबतच जवळपासची घरे रिकामी करण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार एटीएस कमांडोजने घराला चारही बाजूने घेरले आहे. सोबतच घटनास्थळी बॉम्ब डिस्पोजल स्कॉडला सुद्धा पाचारण करण्यात आले आहे. दोन सशंयीताना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर हे ऑपरेशन करण्यात आले. घरातून मोठ्या संख्येने बॉम्ब आणि दारूगोळा जप्त करण्यात आल्याचे समजते.

एटीएस अनेक दिवसांपासून या घरावर लक्ष ठेवून होते. संशयीत हालचालींमुळे एटीएसचे लोक या घरावर लक्ष ठेवून होते. माहिती पक्की असल्याचे समजताच एटीएसने आज हे ऑपरेशन सुरू केले आहे. घटनास्थळी स्थानिक पोलीस सुद्धा उपस्थितीत होते. ज्या घराला एटीएसने घेराव घातला आहे ते शाहिद नावाच्या एका व्यक्तीचे आहे. येथे तीन-चार संशयीत तरूण अनेक दिवसांपासून ये-जा करत होते. ज्यापैकी दोन एटीएसच्या ताब्यात आहेत. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर एटीएसने हे ऑपरेशन सुरू केले.

दोन प्रेशर कुकर आणि टाइम बॉम्ब जप्त

IG जी. के. गोस्वामी यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या या ऑपरेशनमध्ये आतापर्यंत दोन प्रेशर कुकर बॉम्ब, टाइम बॉम्ब आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त केली आहेत. माहितनुसार, पकडलेल्या दहशतवाद्यांचे कनेक्शन अलकायदाशी असल्याचे समोर आले आहे. बॉम्बविरोधी पथकाने स्फोटके निष्क्रिय केली आहेत.

पाकिस्तानी हँडलर असल्याचा दावा

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्या दोन संशयीतांना पकडण्यात आले आहेत, ते दोघे
पाकिस्तानी हँडलर आहेत. वसीम नावाच्या एका व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद आढळल्यानंतर हे
ऑपरेशन करण्यात आले.

हे देखील वाचा

Pune News | विकेंडचे कारण देत सुरु असलेल्या कारवाईचा जाहीर निषेध; पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाकडून संतप्त प्रतिक्रिया

Immunity Booster | ‘रोग प्रतिकारशक्ती बूस्टर डोस’ टोमॅटोचा रस, मिळतील आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  UP News | lucknow up ats cordoned off a house in kakori area of lucknow militant hideout two al qaeda suspects detained

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update