महामार्गाच्या रस्त्यावर चालु असलेल्या ‘डान्सिंग’ कारमधील सेक्स रॅकेटचा ‘पर्दाफाश’

गाजीपूर : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील गाजीपुरमध्ये सेक्स रॅकेट चालवण्यासाठी वेगळाच मार्ग निवडला आहे. ज्यामुळे पोलिसांच्या तावडीत न सापडता हा गोरखधंदा सुरु ठेवता येईल. यापूर्वी सेक्स रॅकेट एखाद्या फार्महाऊस, बंगल्यात किंवा एखाद्या हॉटेलमध्ये चालवले जात होते. मात्र, आता पोलिसांकडून पकडले जाऊ नये यासाठी महामार्गावर चालत्या गाडीत सेक्स रॅकेट चालवले जात असल्याचे उघड झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गाझीपूरमधील राष्ट्रीय महामार्गावर वाराणसीहून कॉल गर्ल घेऊन जाणार्‍या लक्झरी कारमधील तीनजण चालत्या गाडीत अश्लिल चाळे करीत होते. महामार्ग पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला मात्र, ते थांबले नाहीत. अखेर महामार्ग पोलिसांनी गाजीपूर पोलिसांची मदत घेऊन त्यांचा पाठलाग करून त्यांना आडवले. पोलिसानी गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे दिसून आले.

दरम्यान, तीन लोक वाराणसीहून कॉल गर्ल एका अलिशान कारमधून राष्ट्रीय महामार्गावरून गाजीपूरवरून मऊच्या दिशेने जात होते. गाडी ज्या पद्धतीने हळू-हळू जात होती आणि संशयास्पदरित्या हालत होती त्यामुळे पोलिसांना संशय आला. पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान गाडीला थांबण्याचा इशारा केला. मात्र, कार चालकाने कार न थांबवता मऊच्या दिशेने कार दामटली.

नाकाबंदीवरील पोलिसांनी तात्काळ याची माहिती महामार्गावर असलेल्या पोलीस ठाण्यांना दिली. महामार्गावरील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातील पोलिसांनी कारला घेरून कार पकडण्यात आली. कारचा दरवाजा उघडला असता आतमध्ये तीन व्यक्ती कॉल गर्ल सोबत अक्षेपार्ह अवस्थेत आढळून आले. तसेच गाडीमध्ये आक्षेपार्ह वस्तू मिळून आल्या. कारमध्ये दारूची खास व्यवस्था करण्यात आल्याचे पोलिसांना गाडी तपासणीच्यावेळी आढळून आले. अशा प्रकारे चालत्या कारमध्ये सेक्स रॅकेट चालवणारी टोळी कर्यरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like