पोलिस अधिकार्‍यानं कानाखाली ‘वाजवली’, बदल्यात निवृत्त जवानानं थोबाडचं ‘फोडलं’

मऊ (उत्तर प्रदेश) : वृत्तसंस्था – एका सैन्यातून निवृत्त झालेल्या सुभेदार मेजरच्या कानाखाली मारणे एका पोलीस इन्स्पेक्टरला चांगलेच महागात पडले आहे. कानाखाली मारल्याच्या बदल्यात मेजरने इन्स्पेक्टरची चांगलीच धुलाई केली. उत्तर प्रदेशातील मऊ येथील कोतवाली भागात सिराहू पोलिस चौकीत ही घटना घडली असून संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

शहर कोतवाली परिसरातील साराहू पोलिस चौकी येथे तैनात असलेले पोलिस इन्स्पेक्टर प्रताप सिंह निरू रूटीन चेकिंग करत होते. त्याच वेळी गर्दीच्या रस्त्यावरील भागात तीन दुचाकी उभ्या करण्यात आल्या होत्या. इन्स्पेक्टरने कारवाई करत दुचाकी उचलून चौकीत आणल्या. दुचाकीचे मालक भीमा राम यांना याची माहिती मिळताच त्यांनी चौकी गाठली आणि इन्स्पेक्टरना दुचाकी देण्याची विनंती केली, परंतु इन्स्पेक्टरने त्यांचे म्हणणे ऐकले नाही आणि त्यांना शिवीगाळ करत कानाखाली मारली.

भीमा राम यांनी सांगितले की ते सैन्यातून सुभेदार मेजर पदावरून निवृत्त झाले आहेत आणि इन्स्पेक्टरच्या कानाखाली मारल्यानंतर त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्यांनी इन्स्पेक्टरची धुलाई केली. सैन्यातून निवृत्त झालेले सुभेदार हे जिल्ह्यातील सरायलखंसी पोलिस स्टेशन परिसरातील मुजेसर गावचे असून आपल्या वैयक्तिक कामासाठी बाजारात गेले होते. तथापि, इन्स्पेक्टरने दिलेल्या माहितीनुसार भीमा रामविरूद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल एफआयआर नोंदवणार आहे. तर दुसरीकडे भीमा रामदेखील गुन्हा दाखल करण्याबद्दल बोलत आहेत.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या