फसवणुकीचा FIR दाखल झाल्यानंतर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाविरोधात उत्तर प्रदेशच्या कटघर पोलीस ठाण्यात आयपीसीमधील कलम ४२० (फसवणूक) आणि कलम ४०६ नुसार गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, सोनाक्षीला १३ सप्टेंबर २०१८ रोजी एक स्टेज शो परफॉर्मंस करायचा होता. सोनाक्षीवर आरोप आहेत की, तिला २४ लाख रुपयेदेखील देण्यात आले होते. परंतु सोनाक्षी या इव्हेंटला आलीच नाही. यानंतर उत्तर प्रदेशात सोनाक्षीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यानंतर पोलीस चौकशीसाठी तिच्या मुंबईतील घरी आले. या प्रकरणी मार्च २०१९ मध्ये अलाहाबाद हायकोर्टाचे जज नाहीद. आर. मोनीस आणि व्ही. के. श्रीवास्तव यांनी सोनाक्षीचे वकिल इमरान उल्लाह यांची बाजू ऐकल्यानंतर आरोप पत्र दाखल होईपर्यंत अटकेला स्थगिती दिली होती.

सोनाक्षीने दिले ‘हे’ स्पष्टीकरण
सोनाक्षीने या प्रकरणी ट्विटरवर पोस्ट शेअर करत आपले म्हणणे मांडले आहे. सोनाक्षीने लिहिले आहे की, “एक आयोजक जो प्रतिबद्धतेवर खरा उतरला नाही. तो विचार करत आहे की, की तो प्रेसमध्ये माझी प्रतिमा खराब करून पैसे कमावू शकतो.”

https://twitter.com/sonakshisinha/status/1149584715927584770

काय आहे प्रकरण
काही दिवसांपूर्वी मुरादाबादमध्ये सोनाक्षी सिन्हासहित ५ लोकांवर फसवणुकीचा खटला दाखल करण्यात आला होत. असा आरोप होता की, सोनाक्षी मानधन घेऊनही शोमध्ये पोहोचली नव्हती. आयोजक प्रमोद शर्माने पोलिसात तक्रार केली परंतु आरोपींविरोधात काहीच कारवाई होत नव्हती. यानंतर दु:खी होत प्रमोदने १३ फ्रेब्रुवारी रोजी विष पीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

कटघर भागातील शिवपुरी गावातील प्रमोद शर्माने मागील वर्षी २४ नोव्हेंबर रोजी मुरादाबादचया एसएसपी मधून सोनाक्षी सिन्हाविरोधात तक्रार दाखल केली होती. १३ सप्टेंबर रोजी सोनाक्षीला दिल्लीतील इंडिया फॅशन अॅंड ब्युटी अवॉर्डमध्ये सादरीकरण करायचं होतं. तपासानंतर सोनाक्षी, टॅलेंट फुल ऑन कंपनीचे अभिषेक सिन्हा, मालविका पंजाबी, धुमिल ठक्कर आणि एडगर सकारिया यांच्यावर आयपीसीमधील कलम ४०६ आणि ४२० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोग्यविषयक वृत्त –

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

वॅक्स करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी !

‘या’ कारणामुळे फुटतो घोळाणा ; घ्या जाणून

‘नागीण’ या आजारावर ‘हे’ घरगुती उपाय !

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या