हिंदू देवी-देवतांवर आक्षेपार्ह भाष्य करणाऱ्या महिलेला अटक

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था –  उत्तर प्रदेशच्या प्रयागराज जिल्ह्यात हिंदू देवी-देवतांवर आक्षेपार्ह भाष्य करणार्‍या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी एफआयआर नोंदवताच आरोपी महिला फरार झाली होती. परंतु पोलिसांनी तिला मंगळवारी पकडले. आरोपी महिलेचे नाव हीर खान असल्याचे सांगितले जात आहे.

प्रयागराजमध्ये पोलिसांना लोकांनी एका महिलेबद्दल तक्रार दिली होती. असा आरोप केला गेला आहे की, या महिलेने हिंदू देवी-देवतांवर आक्षेपार्ह भाष्य करत सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड केला होता. व्हिडिओमध्ये अभद्र भाषा वापरली गेली आहे. तिचे वाईट शब्द आणि भाष्यामुळे लोकांच्या भावना दुखावत आहेत.

ही बाब गांभीर्याने घेत पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला. मिळालेल्या माहितीनुसार, एफआयआर नोंदवल्यानंतर आरोपी महिला फरार झाली. तिला पकडण्यासाठी पोलिसांनी अनेक पथके तयार केली होती. यामुळेच जिल्ह्यातील खुल्दाबाद पोलिस स्टेशनने तिला अटक केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला हीर खान स्वत:चा यूट्यूब चॅनल चालवते. नुकताच तिने यूट्यूबवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. वादग्रस्त व्हिडिओमध्ये हिंदू देवी-देवतांविरूद्ध अभद्र भाष्य केले गेले होते. तिच्या विरोधात आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता पोलिस आरोपी महिलेची चौकशी करत आहेत.