अबब ! एवढा पाऊस झाला की रस्त्यावरच मासे तरंगतायत, घरच बनलं ‘तलाव’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील काही दिवसांपासून पावसाने देशभरात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागात देखील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तरप्रदेशमध्ये देखील पावसाने मोठा धुमाकूळ घातला असून तुम्ही रस्त्यावर कधी मासे पोहताना पहिले आहेत का ?  मात्र उत्तरप्रदेशमधील वाराणसीमध्ये मागील चार दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे रस्ते अक्षरशः माशांचे तलाव झाले आहेत.

बारिश हुई इतनी कि सड़कों पर तैरने लगीं मछलियां, घर बने तालाब

शहरातील तलाव आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत. पाणी रस्त्यावर आले असून तलावातील मासे देखील रस्त्यावर आले असून या माशांना पाहण्यासाठी नागरिक रस्त्यावर गर्दी करत आहेत. त्यांचे फोटो काढून घेण्यात नागरिक व्यस्त असून प्रशासनाच्या बेपर्वाईमुळे नागरिकांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहेत. उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये उत्तरप्रदेशमध्ये देखील पावसाने मोठा धुमाकूळ घातला असून यामध्ये आतापर्यंत अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक ठिकाणी रस्ते खचल्याने लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
बारिश हुई इतनी कि सड़कों पर तैरने लगीं मछलियां, घर बने तालाब
दरम्यान, मागील 102 वर्षांमध्ये सप्टेंबर महिन्यात सर्वात जास्त पाऊस झाला असून 247.1 मिलीमीटर पाऊस पडला आहे. 1901 नंतर या वर्षी इतक्या मोठ्या प्रमाणात रेकॉर्डब्रेक पाऊस पडला आहे.

 

Visit : Policenama.com