UP Religion Conversion Case | उत्तर प्रदेशातील बेकायदेशीर धर्मांतराचं बीड कनेक्शन आलं समोर, PM मोदींनी कौतुक केलेल्या तरुणाला अटक

बीड (Beed) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – UP Religion Conversion Case उत्तर प्रदेशातील बेकायदा धर्मांतर प्रकरणी (Illegal conversion case in Uttar Pradesh) दहशतवादी विरोधी पथकाने (ATS) सोमवारी आणखी तिघांना अटक केली आहे. यापूर्वी दोघांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. ATS ने सोमवारी मुफ्ती जहांगीर कासमी (Mufti Jahangir Kasmi) आणि मोहम्मद उमर गौतम (Mohammed Omar Gautam) या दोघांना अटक (Arrest) केली होती. मूकबधिर मुलं आणि महिलांचं (handicapped children and women) धर्मांतर केल्याच्या प्रकरणात (Religion Conversion Case) त्यांचा सहभाग असून 1 हजार पेक्षा जास्त लोकांचं त्यांनी धर्मांतर केलं असल्याचं उत्तर प्रदेश पोलिसांनी (Uttar Pradesh Police) सांगितले. दरम्यान या धर्मांतर प्रकरणात महाराष्ट्रातील (Maharashtra) बीडचं कनेक्शन (Beed connection) समोर आलं आहे.

बीड कनेक्शन आलं समोर

उत्तर प्रदेश पोलिसांनी (Uttar Pradesh Police) सोमवारी मन्नू यादव उर्फ अब्दुल (Mannu Yadav alias Abdul), इरमफान शेख (Irmafan Sheikh) आणि राहुल भोला (Rahul Bhola) यांना अटक (Arrest) केली आहे. यामधील इरफान शेख (Irmafan Sheikh) हा महाराष्ट्रातील (Maharashtra) बीड जील्ह्यातील (Beed District) परळी तालुक्यातील (Parli taluka) शिरसाळा (Shirsala) येथील रहिवासी आहे. बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणात (Illegal conversion case) इरफान शेखचा (Irmafan Sheikh) समावेश असल्याची माहिती समोर आल्यानंतर बीडमध्ये (Beed) एकच खळबळ उडाली आहे.

इरफान सध्या दिल्लीत वास्तव्यास

उत्तर प्रदेश पोलिसांनी (Uttar Pradesh Police) अटक केलेला इरफान शेख (Irmafan Sheikh) सध्या दिल्लीत वास्तव्यास (Delhi) आहे. दिल्लीतील (Delhi) मिनिस्ट्री ऑफ चाइल्ड वेल्फेअरमध्ये (Ministry of Child Welfare) इंटरप्रीटर (Interpreter) म्हणून काम करतो. परंतु इरफानला अवैध धर्मांतर प्रकरणामध्ये (Illegal conversion case) यूपी एटीएसने (UP ATS) ताब्यात घेतले आहे. शिरसाळा येथे त्याचं प्राथमिक शिक्षण (Elementary education) झालं. सध्या तो प्रोफेसर (Professor) असून दिल्लीत वास्तव्यास आहे, अशी माहीती त्याच्या नातेवाईकांनी (relatives) दिली.

UP Religion Conversion Case | pm modi praises beed youth irfan sheikh arrested in up religion conversion case

PM मोदींकडून इरफानचे कौतुक

विशेष म्हणजे, अहमदाबाद (Ahmedabad) येथील आयोजित विद्यालयात (School) कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) उपस्थित होते. यावेळी शिरसाळा (Shirsala) गावचे भूमीपूत्र माझे लहान भाऊ प्रा. इरफान खाजा खाँ पठाण (Irfan Khaja Khan Pathan) यांचं उत्कृष्ट कार्याबद्दल व्यासपीठावर स्वत: नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कौतूक (Appreciation) करत शाब्बासकीची थाप मारली. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या होत्या, असं देखील इरफानच्या नातेवाईकांनी सांगितलं. तसेच या प्रकरणात इरफानचे नाव आल्याने कुटुंबाला धक्का बसला आहे. इरफान असे करु शकत नाही, असे
देखील त्याच्या मामानं सांगितलं.

काय आहे प्रकरण ?

उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) अनेक निरपराध मुले, महिला आणि इतरांच्या धर्मांतराबाबत
(Conversion) उत्तर प्रदेश एटीएसनं ((Uttar Pradesh ATS) धक्कादायक खुलासा केला. या
प्रकरणामागे पाकिस्तानचा (Pakistan) हात असल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात आला आहे.
लवकरच उत्तर प्रदेश सरकार (Government of Uttar Pradesh) केंद्रीय गृह मंत्रालयाला
(Union Home Ministry) लेखी पत्र देऊन या प्रकरणाची माहिती देणार आहे. या प्रकरणाचा
तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि गुप्तचर यंत्रणेकडे सोपवला जाऊ शकतो.

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : UP Religion Conversion Case | pm modi praises beed youth irfan sheikh arrested in up religion conversion case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update