Coronavirus : भारतानं शोधला आहे का ‘कोरोना’वर उपाय, सैफई पीजीआयमध्ये 20 रूग्णांवर यशस्वी झाली चाचणी

कानपुर : उत्तर प्रदेशच्या इटावामधील सैफई वैद्यकीय विद्यापीठाने तयार केलेले आयुर्वेदिक औषध राज निर्वाण बुटी (आरएनबी) कोरोनाच्या रूग्णांना दिलासा देत आहे. कुलपती प्रो. डॉ. राजकुमार यांनी म्हटले विद्यापीठात दाखल 20 रूग्णांवर या बुटीचे सकारत्मक परिणाम दिसून आले.

या परिणामांवर पायलट स्टडीसुद्धा करण्यात येत आहे. लवकरच देशाच्या समोर हा उपाय येईल. प्रो. डॉ. राजकुमार म्हणाले, हे औषध 12 आयुर्वेदिक मिश्रणांपासून तयार केले आहे. कोरोना रूग्णांवर रिसर्चच्या प्रोटोकॉलचे पालन करून त्याचे परिक्षण करण्यात आले आहे.

कोरोनाची प्रकरणे सुरू होताच विद्यापीठाने यावर संशोधन सुरू केले होते. आम्ही सर्वात आधी हे पाहिले की, कोरोना शरीराच्या कोणत्या भागावर प्रथम अटॅक करतो. ज्याच्यामुळे कोविड रूग्णाचा मृत्यू सुद्धा होतो. यानंतर प्राचीन उपचाराच्या त्या औषधांची माहिती घेण्यात आली जी या सिस्टमसाठी उपयोगी आहेत.

नंतर या प्राचीन औषधांवर आधुनिक उपचारात झालेल्या शोधांचा अभ्यास केला. या संशोधनासाठी जागप्रसिद्ध आयुर्वेदाचार्यांची मदत सुद्धा घेण्यात आली. नंतर कोविड-19 हॉस्पिटलमध्ये भरती 103 रूग्णांमधून 20 रूग्णांची निवड केली, ज्यांच्यामध्ये कोरोनाची जास्त लक्षणे होती.

इथिकल क्लियरन्स घेतल्यानंतर या रूग्णांवर क्लिनिकल ट्रायल डॉक्यूमेन्ट्री प्रुफसह रिसर्च सुरू केले. राज निर्वाण बुटीचे रूग्णांवर सकारात्मक परिणाम दिसून आले. सर्व रूग्ण पाच ते सात दिवसात बरे झाले.

राज निर्वाण बुटीची 125 मिली ग्रॅम मात्रा पाच मिलीग्रॅम मधासोबत दिली जाते. प्रो. राजकुमार यांनी सांगितले की, ही ट्रायल पुढे सुद्धा 20 अन्य करोना पॉझिटिव्ह रूग्णांवर केली गेली. जर ही ट्रायल यशस्वी झाली तर हे मानण्यात येईल की, भारताने कोरोना ट्रीटमेंटचा शोध लावला आहे.