सोनभद्र : जमिनीच्या वादातून झालेल्या बेछूट गोळीबारात ९ जणांचा मृत्यू

लखनऊ : वृत्‍तसंस्था – उत्‍तरप्रदेशातील सोनभद्र जिल्हयातील उभभा गावात किरकोळ जमिनीच्या वादातून सरपंच आणि गावकरी अशा दोन गटात जोरदार भांडणे झाली. त्यामध्ये एकाच गटातील 9 जणांचा मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, मृत्युचा आकडा वाढण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे.

घोरावलच्या मूर्तियाँ ग्रामपंचायतमधील भांडणात जोरदार लाठी हल्‍ला झाला. या भांडणांमध्ये 5 पुरूष आणि 4 महिलांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार गेल्या अनेक वर्षापासुन दोन्ही गटांमध्ये वेळावेळी भांडणे होत होती. जमिनीवरून दोन गटात वाद होत होता.

सरपंचाच्या समर्थकाकडून गोळीबार –
सरपंचाने सुमारे 2 वर्षापुर्वी काही गुंठे जमिन खरेदी केली होती. आज (बुधवारी) सरपंच त्याच्या काही समर्थकांसह जमिनीवर कब्जा घेण्यासाठी गेला होता. गावकर्‍यांनी त्यास प्रचंड विरोध केला असता सरपंचाच्या समर्थकाच्या कटाने गोळीबार सुरू केला. केलेल्या बेछुट गोळीबारात 9 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये चार महिलांचा समावेश आहे.

परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त –
घटनेची माहिती मिळाल्यानंतर सोनभद्रचे पोलिस अधीक्षक इतर अधिकार्‍यांसह घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी गोळीबार केल्याप्रकरणी आत्‍तापर्यंत दोघांना अटक केली आहे. उभभा गावात मोठया प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.दुपारी चार वाजेपर्यंत 5 पुरूषांसह 4 महिलांचे मृतदेह शासकीय रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले होते.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी माहिती मागवली –
घडलेल्या गंभीर घटनेची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तात्काळ माहिती मागविली असून घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कुटूंबियांच्या प्रती सहानभुती व्यक्‍त केली आहे. गोळीबारात जखमी झालेल्यांवर तात्काळ शासकीय रूग्णालयात उपचार करण्यात यावेत असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला असुन पोलिस महासंचालकांना या प्रकरणावर वॉच ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

 

 तजेलदार त्त्वचेसाठी ‘टोमॅटो’ उपयोगी, जाणून घ्या सामान्य गोष्टींचे ‘खास गुण’

 ‘किडनी’ फेल्युअर होऊ नये म्हणून करा ‘या’ उपाययोजना

 ‘अंडरआर्म डार्कनेस’ दूर करण्याचे ९ घरगुती रामबाण उपाय

 ‘या’ ५ सवयी लावून घ्या, तुम्ही वारंवार पडणार नाहीत आजारी

 भाज्यांच्या सालीमध्ये सुद्धा असतात औषधी गुण, करा ‘हे’ उपाय

 दुखणे कमी करण्यासाठी औषधांशिवाय ‘हे’ उपायदेखील लाभदायक