आता वाघीणही मॉबलिंचिंगची शिकार, व्हिडीओ बनवत लोकांकडून ‘कॉमेंट्री’ (व्हिडीओ)

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशातील पिलिभीत जिल्ह्यातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका गावातील लोकांनी एका वाघिणीची मारहाण करून हत्या केली आहे. व्हिडिओमध्ये स्प्ष्टपणे दिसून येत आहे की, गावातील लोक काठीने वृद्ध वाघिणीला मारहाण करत आहेत. गंभीर जखमी झालेली वाघीण जीव वाचवण्यासाठी मोठ्या हिंमतीने उठली. वाघीण उठल्यानंतर लोक पळून जाऊ लागले परंतु वाघीण गंभीररीत्या जखमी झाली होती. जखमी झालेल्या वाघिणीचा आज सकाळी मृत्यू झाला.

वाघिणीची अशाप्रकारे झालेल्या हत्येमुळे टायगर रिजर्व प्रशासनावर जोरदार टीका होत आहे. व्हिडिओमध्ये वर्दी परिधान केलेले लोकही दिसत आहेत. पिलिभीत जिल्ह्यातील टायगर रिजर्वच्या दियोरीया रेंजच्या जवळ मानव आणि प्राण्यांमध्ये संघर्ष झाला होता. वाघिणीने ९ गावकऱ्यांवर हल्ला करून जखमी केले होते. यानंतर गावकऱ्यांनी एकत्र येऊन काठीच्या मदतीने वाघिणीला अत्यंत वाईट पद्धतीने मारहाण केली. यानंतर जखमी झालेली वाघीण गावाच्या जवळील जंगलात एका जागी बसून राहिली. तिला उठता येत नव्हते. अखेर गंभीररीत्या जखमी झालेल्या वाघिणीने प्राण सोडले.

पिलिभीत टायगर रिजर्वचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. परंतु तिच्यावर उपचार केले गेले नाहीत. जखमी वाघीण रात्रभर एकाच जागी बसून होती. अखेर तिने आज सकाळी प्राण सोडले. दरम्यान टायगर रिजर्वच्या टीम वाघिणीचे शवविच्छेदन करेल आणि गावकऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करेल. जिल्हाधिकाऱ्यांनी वनविभागाला आरोपी गावकऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –