खुशखबर ! इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर बंपर फेस्टिव्ह ऑफर्स, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   फेस्टिव्ह सीझन सुरू होताच ऑफर्सचा वर्षाव सुरू झाला आहे. सॅमसंग, एलजी, शाओमी, पॅनासोनिक, रियलमी, वीवो, बीपीएल सारख्या कंपन्या या फेस्टिव्ह सीझनमध्ये महागडे स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर 50 टक्केपर्यंत डिस्काऊंट देत आहेत. जाणकारांच्या माहितीनुसार, या सेगमेंटमध्ये मागील दोन महिन्यात विक्री कमी होती. यासाठी या कंपन्या बंपर डिस्काऊंट देत आहेत.

तर, एन्ट्री लेव्हलचे स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर यावेळी जास्त सूट असणार नाही. याची मागणी जास्त असल्याने या एंन्ट्री लेव्हल वस्तूंवर जास्त सूट मिळणार नाही. सप्लायच्या समस्येमुळे टेलिव्हिजन कंपन्या 10-20 टक्केपर्यंत डिस्काऊंट देऊ शकतात.

पॅनासॉनिक इंडियाचे सीईओ मनीष शर्मा यांनी सांगितले की, प्रीमियम प्रॉडक्टवर मोठ्या ऑफर दिल्या जातील. सप्लाय आणि इन्व्हेंट्री दोन्ही कारणामुळे या कॅटेगरीत डिस्काऊंट जास्त मिळेल. तर, एलजी इंडियाचे व्हाईस प्रेसीडेंट विजय बाबू यांनी सांगितले की, मागणी जास्त असल्याने फ्रिज, वॉशिंग मशीन किंवा मायक्रोवेव्हवर जास्त डिस्काऊंट मिळणार नाही.

फ्लिपकार्टचा ’बिग बिलियन डेज’ सेल 16 ते 21 ऑक्टोबरपर्यंत

कंपनीचा वार्षिक ’बिग बिलियन डेज’ फेस्टिव्ह सेल 16 ते 21 ऑक्टोबरला होईल. तर मंत्रावर ’बिग बिलियन सेल’ 16 ते 22 ऑक्टोबरला आहे. कंपनीच्या वक्तव्यानुसार, या आयोजनादरम्यान सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रम (एमएसएमई) तसेच अन्य विक्रेत्यांना सुद्धा वाढीची संधी मिळेल.

17 ऑक्टोबरपासून अमेझॉनचा सेल

अमेझॉनने सुद्धा आपल्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलची घोषणा केली आहे. अमेझॉनचा ग्रेट इंडिया फेस्टिव्हल सेल फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलच्या एक दिवसानंतर सुरू होईल. फ्लिपकार्टचा सेल 16 ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि 21 ऑक्टोबरपर्यंत चालेल. तर अमेझॉनचा सेल 17 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे, परंतु तो कधीपर्यंत सुरू राहील याची घोषणा सध्या केलेली नाही. मात्र, अमेझॉन प्राईम मेंबरशिप यूजर्स या सेलचा लाभ 16 ऑक्टोबरपासून घेऊ शकतात.