धक्कादायक ! छेडछाडीला विरोध केल्याने दलित कुटुंबाला गाडीने चिरडले, २ महिला ठार

लखनऊ :  वृत्तसंस्था – छेडछाडीचा विरोध करणे एका दलित कुटुंबाला जीवावर बेतले. गावातील दोन जणांच्या छेडछाडीला विरोध केल्याने त्यांनी संपुर्ण कुटुंबालाच गाडीने चिरडले. त्यात जखमी झालेल्या दोन महिला जागीच ठार झाल्या. तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना उत्तर प्रदेशातील बुलंदशहरच्या चांदपूर गावात घडली.

या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर नातेवाईकांनी मयतांचे मृतदेह रस्त्यावर ठेवून रस्ता जाम केला होता.

याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अपघाताची नोंद केली होती. मात्र उच्च जातीच्या ३० वर्षीय तरुणाने दलित कुटुंबाला गाडीने चिरडल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेजदेखील मिळवले असून एक कार वेगाने रस्त्यावरून जात आहे.

आणि तिच्या मागे लोक धावत आहेत. असे दिसते आहे. त्यासोबतच एक मुलगी यासंदर्भातील माहिती देतानाचाही व्हिडीओ आहे. त्यात तिची शेजारी गावातील एक तरुण छेडछाड करत आहे. त्याने काही वेळापुर्वी धमकी दिली होती. असे ती मुलगी सांगत आहे.

आरोग्य विषयक वृत्त

फॅमिली प्लनिंगसाठी हे ‘ वय ‘ योग्य

या मेकअप टिप्समुळे तुम्ही सावळे असाल तरीही दिसाल सुंदर

मधुमेहामुळे पाय गमावण्याची वेळ येऊ नये यासाठी ‘ही’ काळजी अवश्य घ्या

हाडांमधून वारंवार आवाज येणे हे भविष्यातील समस्यांचे लक्षण