शिरोली गावच्या महिला उपसरपंचाला बर्थडे पार्टी भोवली, FIR दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइनखेड तालुक्यातील शिरोली गावच्या उपसरपंच महिलेने ग्रामपंचायत कार्यालयात केलेला वाढदिवस महागात पडला आहे. गावात कोरोनाचे 10 रुग्ण असतानाही महिलेने सोशल डिस्टन्सचे नियम धाब्यावर बसवून वाढदिवस साजरा केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जया काळूराम दसगुडे असे या उपसरपंच महिलेचे नाव आहे.

माजी उपसरपंचासह 6 सदस्यांनी या उपसरपंचांच्या विरोधात गटविकास अधिकारी अजय जोशी यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यानुसार 188 कलम अंतर्गत त्यांच्यावर खटला भरण्यात आला आहे. विशेष म्हणजे या वाढदिवस कार्यक्रमाला ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सुध्दा सहभागी झाले होते. शिरोली गावात कोरोनाची लागण झालेले 10 रुग्ण झाल्याने भीतीदायक वातावरण होते. अशातच उपसरपंच दसगुडे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात वाढदिवस साजरा केला. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यात काहींनी मास्क घातलेला तर काहींनी ना घालताच उपस्थिती लावल्याचे समोर आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा वाढदिवस साजरा केल्यानंतर माजी उपसरपंच जितेंद्र वाडेकर, यांनी गटविकास अधिकारी जोशी यांच्या कडे लेखी तक्रार केली होती.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like