Upcoming IPO | तयार ठेवा पैसे ! येणार आहेत कमाईच्या 23 संधी, अदानीपासून बाबा रामदेव पर्यंतच्या कंपन्यांचे येणार आयपीओ

नवी दिल्ली : वृत्त संस्था Upcoming IPO | चालू जानेवारी-मार्च तिमाहीतही आयपीओ बाजारात तेजी राहील. या तिमाहीत 23 कंपन्या आयपीओद्वारे 44,000 कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहेत. मर्चंट बँकर्सनी ही माहिती दिली. तंत्रज्ञानावर आधारित कंपन्या आयपीओमधून निधी उभारण्यात आघाडीवर असतील. (Upcoming IPO)

2021 मध्ये 63 कंपन्यांनी IPO तून जमा केले 1.2 लाख कोटी

यापूर्वी 2021 मध्ये 63 कंपन्यांनी आयपीओद्वारे 1.2 लाख कोटी रुपयांची विक्रमी रक्कम जमा केली होती. मात्र, या काळात महामारीमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. या कंपन्यांव्यतिरिक्त, POWERGRID INVIT ने IPO द्वारे 7,735 कोटी रुपये उभे केले, तर ब्रुकफील्ड इंडिया रिअल इस्टेट ट्रस्टने REIT (रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट) द्वारे 3,800 कोटी रुपये उभे केले.

येत आहेत हे आयपीओ

मर्चंट बँकर्सनी सांगितले की, मार्च तिमाहीत ज्या कंपन्यांची आयपीओद्वारे निधी उभारण्याची अपेक्षा केली त्यामध्ये OYO (रु. 8,430 कोटी) आणि पुरवठा साखळीशी संबंधी कंपनी डेल्हिवेरी (रु. 7,460 कोटी) यांचा समावेश आहे.

याशिवाय अदानी विल्मर (रु. 4,500 कोटी), इमक्योर फार्मास्युटिकल्स (रु. 4,000 कोटी), वेदांत फॅशन्स (रु. 2,500 कोटी), पारादीप फॉस्फेट्स (2,200 कोटी), मेदांता (2,000 कोटी) आणि झिगो (800 कोटी रुपये) यांचे आयपीओ देखील तिमाही येण्याची शक्यता आहे.

मर्चंट बँकर्स म्हटले की स्कॅनरे टेक्नॉलॉजीज, हेल्थियम मेडटेक आणि सहजानंद मेडिकल टेक्नॉलॉजीज देखील पुनरावलोकनाधीन तिमाहीत आयपीओ लाँच करू शकतात. ’रिकूर’ क्लबचे संस्थापक एकलव्य म्हणाले, कंपन्यांद्वारे आयपीओच्या माध्यमातून लोकांकडून भांडवल उभारण्यासाठी नोंदणी केली जाते, ज्यामुळे त्यांच्या शेयरची तरलता वाढते. (Upcoming IPO)

प्रतीक सिंग, संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (LearnApp.com CEO) म्हणाले की, तंत्रज्ञान कंपन्यांना आता जागतिक स्तरावर विस्तार करायचा आहे आणि त्यासाठी त्यांना भांडवलाची गरज आहे. त्यामुळे त्या आयपीओच्या मार्गाने निधी उभारण्यास प्राधान्य देत आहेत.

Web Title : Pune Crime | A 23-year-old man committed suicide by jumping into
a pool after cutting a vein in his hand due to depression

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवून केले 9 महिन्यांची गर्भवती; कोंढव्यातील घटना

Pune Crime | कलयुग ! पोटच्या मुलानं केला आई-बापावर खुनी हल्ला, आई जागीच ठार; इंदापूर तालुक्यातील घटना

TET Exam  Scam | टीईटी पेपर फुटी प्रकरणात नवा खुलासा, आरोपी अश्विनकुमारने 700 विद्यार्थ्यांचे बदलले मार्क, G.A. Software चा संस्थापक गणेशन याचाही सहभाग उघड

LIC Kanyadan Policy | दररोज वाचवा 130 रुपये, 25 वर्षानंतर मिळतील 27 लाख, जाणून घ्या काय आहे प्लान

 फायनान्स कंपनीच्या लोकांकडून महिलेचा विनयभंग, ओढून नेली रिक्षा

 लग्नाचे आमिष दाखवून आईबरोबर शारिरीक संबंध, मुलीशी लग्न लावून देण्यासाठी दिली धमकी