2020 मध्ये WhatsApp मध्ये मिळणार मोठे फिचर्स, बदलून जाईल तुमच्या अनुभव, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – या वर्षी वॉट्सअ‍ॅप मध्ये नवीन फिचर आले आहे. काही फिचर प्रायवसीशी संबंधित आहे तर काही फिचर युजर्सशी संबंधित होते. आता ग्रुपला आधीपेक्षा प्रायवेट करण्यात आले आहे. त्यामुळे आता तुमच्या परवानगी शिवाय तुम्हाला कोणी ग्रुपमध्ये ऍड करू शकणार नाही.

2020 मध्ये कंपनीने काही नवीन फिचर आणण्याची तयारी केली आहे. ज्यामुळे तुमचा वॉट्सअ‍ॅप युजचा अनुभव बदलणार आहे. यामध्ये सर्वात मोठा फिचर हा डार्क मोडचा असणार आहे. परंतु यापेक्षाही महत्वाचा फिचर Disappearing Message बाबतचे असणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या दोनीही फीचरची टेस्टिंग सध्या सुरु आहे. डार्क मोडचा पर्याय अँड्रॉइड बीटासाठी देण्यात आलेला आहे आणि यासाठी तीन पर्याय देण्यात आलेले आहेत.

मल्टिपल डिवाइस सपोर्ट
या फिचरवर कंपनी काही दिवसांपासून काम करत आहे 2020 मध्ये हे नवीन फिचर येणार आहे. यानुसार एक वॉट्सअ‍ॅप अनेक फोनमध्ये चालवता येणार आहे.

स्टेटस आणि क्लोज फ्रेंड्स
इंस्टाग्राममध्ये हे फिचर सुरु करण्यात आलेले आहे. क्लोज फ्रेंड्सच्या कस्टम स्टेटसचा पर्याय वॉट्सअ‍ॅप मध्ये दिला जाऊ शकतो.

अ‍ॅप ब्राऊजर
WhatsApp मध्ये 2020 ला इनअ‍ॅपचा पर्याय देखील दिला जाऊ शकतो. Android Beta वर्जन मध्ये सर्वात आधी हे फिचर दिसून आले होते. यानुसार कोणतीही लिंक तुम्ही वॉट्सअ‍ॅपमध्ये ओपन करू शकता.

सर्च इमेज फिचर
वॉट्सअ‍ॅप एका अशा फीचरचे टेस्टिंग करत आहेत ज्यानुसार पाठवलेले फोटो आणि इतर डेटा सर्च केला जाऊ शकतो.

बुमरँग फिचर
इंस्टग्राम युजर्स ला हे फीचरला माहिती असेल. व्हिडीओ लूप बनवण्याचा हे फिचर आहे. 2020 मध्ये हे सुरु केले जाणार आहे.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/