सुशात सिंह आत्महत्या प्रकरणाच्या तपासात CCTV कॅमेर्‍याबाबत नवीन माहिती उघड, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाबाबत नवीन माहिती समोर आली आहे. सुशांत ज्या इमारतीत वास्तव्य करत होता त्या इमारतीचं सीसीटीव्ही फुटेज मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र सुशांतच्या घरात कोणताही सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता. सुशांतच्या अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही कॅमेरे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले. याबाबत फॉरेन्सिक अहवालाची पोलिसांना प्रतीक्षा आहे.

दरम्यान, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची वांद्रे पोलिसांनी सोमवारी चौकशी केली. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. संजय लीला भन्साळी हे सुशांत सिंह सोबत ४ चित्रपट करण्याचा विचार करत होते. तारखा आणि इतर काही कारणांमुळे सुशांत हे चित्रपट करु शकला नाही. मुंबई पोलीस सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत. याप्रकरणी आतापर्यंत ३० पेक्षा अधिक जणांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. तसेच आणखी एक बाब कटाक्षाने तपासली जात आहे. ते म्हणजे सुशांतचे ट्विटर हँडल. सुशांतच्या ट्विटर हँडलवरुन काही ट्विट डिलिट झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यासंदर्भात मुंबई पोलिसांना ट्विटर नोडलच्या प्रतिसादाची प्रतीक्षा आहे.

१४ जून रोजी सुशांत सिंह राजपूत या अभिनेत्याने त्याच्या मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे सगळं बॉलिवूड हादरलं. दरम्यान, सुशांत सिंह राजपूत हा घराणेशाहीचा बळी ठरला असा एक वाद सुरु झाला. सुशांत सिंह राजपूत याला सिनेमा मिळू दिले नाहीत असेही आरोप झाले. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर या गोष्टी समोर आल्याने पोलिसांनी या अनुषंगाने तपास करण्यास सुरुवात केली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like