खुशखबर ! SBI कडून ग्राहकांना मोठे GIFT ; घरबसल्या करा बँकेचे ‘हे’ व्यवहार

'या' वेबसाईटला भेट द्या !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – देशातील सर्वात मोठी बँक SBI आपल्या ग्राहकांची नेहमीच काळजी घेत असते. आता SBI ने पुढे जाऊन वृद्ध आणि दिव्यांग ग्राहकांकरिता नवीन योजना आणली आहे. वृद्ध आणि दिव्यांग खातेदारांना प्रत्येकवेळी बँकेत जाऊन आर्थिक व्यवहार करणे त्रासदायक ठरते म्हणून आता SBI ने डोअर स्टेप बँकिंग सेवा सुरु केली आहे.

डोअर स्टेप बँकिंग सेवेअंतर्गत ७० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या तसेच दिव्यांग ग्राहकांकरिता SBI च्या या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. या सुविधेत कॅश पिकअप आणि डिलिव्हरीसहित अनेक सेवा आहेत. RBI ने जाहीर केलेल्या आदेशांनुसार डोअर स्टेप सेवा सुरू झाली आहे.

  • काय आहे डोअर स्टेप सेवा
    या सुविधेअंतर्गत एकूण ६ सुविधा आहेत. कॅश पिकअप आणि डिलिव्हरी, चेक पिकअप, चेकबुकच्या मागणीसाठी भरलेल्या रिसिटची पिकअप, ड्राफ्टची डिलिव्हरी आणि टर्म डिपाॅझिटचा सल्ला, लाइफ सर्टिफिकेटचं पिकअप, इन्कम टॅक्स वाचवण्याशाठी फाॅर्म १५H चे पिकअप यांचा समावेश आहे.
  • काय आहेत अटी ?
    *
    डोअरस्टेप बँकिंग सेवेचा फायदा केवायसी झालेले खातेधारकच घेऊ शकतात.
    * बँकेजवळ तुमचा खात्याला जोडलेला वैध मोबाइल नंबर असायला हवा.
    * एसबीआय शाखेच्या ५ किमीमध्ये तुमचं घर असायला हवं.
    * जाॅइंट अकाऊंट, छोट्या मुलांचं अकाऊंट आणि नाॅन पर्सनल अकाऊंट याचा फायदा घेऊ शकत नाही.
  • द्यावी लागेल फी
    ग्राहकांना या सेवेसाठी फी द्यावी लागेल. आर्थिक व्यवहार असेल, तर प्रति व्यवहार १०० रुपये द्यावे लागतील. आर्थिक नसलेल्या व्यवहारासाठी ६० रुपये द्यावे लागतील.याकरिता तुम्हाला तुमच्या जवळच्या SBI शाखेत जाऊन रजिस्टर करावं लागेल. तसेच दिव्यांग व्यक्तींना मेडिकल सर्टिफिकेट द्यावं लागेल.

    अधिक माहितीसाठी
    https://www.sbi.co.in/portal/web/services/doorstep-banking-services
    या साईट ला भेट द्या.