गडचिरोलीत चकमक ! 13 नक्षलवाद्यांचा ‘खात्मा’

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन – नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात पोलीस, सी ६० पथक आणि नक्षलवादी यांच्यात मध्यरात्रीपासून चकमक सुरु असून त्यात आतापर्यंत १३ नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती समोर आली आहे. याशिवास अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे.

एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलीस मदत केंद्रांच्या हद्दीतील पैदी जंगल परिसरात ही चकमक उडाली आहे.
पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली सी ६० पथक नक्षलविरोधी अभियान राबवत आहेत.

सध्या गडचिरोली भागात तेंदुपत्ता गोळा करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर चालते. याच्या व्यापारातून नक्षलवादी मोठ्या प्रमाणावर खंडणी गोळा करतात. यासंदर्भात नक्षलवाद्यांची एक बैठक पैदी जंगलात होणार असल्याची माहिती सी ६० पथकाला मिळाली होती. त्यानुसार या पथकाने जंगलात सर्च ऑपरेशन सुरु केले. हे ऑपरेशन सुरु असताना पहाटेच्या सुमारास नक्षलवाद्यांबरोबर या कमांडोंची चकमक उडाली. ही चकमक अजूनही सुरु असल्याचे सांगण्यात येत असून कमांडोंनी केलेल्या गोळीबारात अनेक नक्षलवादी जखमी झाले आहेत.