UIDAI नं सुरू केली नवी सर्व्हिस ! Aadhaar Card संदर्भात काहीही प्रश्न असल्यास मिनिटात मिळेल उत्तर, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्हाला आधार कार्ड संबंधित काही शंका किंवा तक्रार असेल तर आता त्याचे निवारण तात्काळ होणार आहे. आधार यूजर्सच्या समस्या निवारण करण्यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने ‘Ask Aadhaar Chatbot’ लॉन्च केले आहे. याद्वारे यूजर्सच्या आधारसंबंधित तक्रारी आणि शंकांचे निवारण होईल.

काय आहे Ask Aadhaar Chatbot –
चॅटबोट एक सॉफ्टवेअर अ‍ॅप्लिकेशन आहे जे इंटरफेससारखे काम करेल आणि आपल्या आर्टिफिशिअल इंटेलिजेंसच्या मदतीने ग्राहकांच्या प्रश्नाचे उत्तर देईल.

125 कोटी लोकांना मिळणार आधारची ओळख –
2010 मध्ये केंद्र सरकारने युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आधारला लागू होईल. याबरोबर आधारने एक नवे रेकॉर्ड बनवले आहे. आतापर्यंत एकूण 125 कोटी लोकांना आधारअंतर्गत नोंदणी केली गेली आहे. आधारसंबंधित सरकारचे हे यश अशावेळी आले आहे की जेव्हा मागील काही दिवसांपूर्वी सरकारी योजना आणि कागदपत्रांसाठी सरकारने आधार अनिवार्य केले आहे.

37 हजार कोटीवेळा अपडेट करण्यात आले आहे आधार –
सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, आधार संबंधित सेवांना जवळपास 37 हजार कोटी वेळा वापरले गेले आहे.

कसे करतात हे काम –
जर तुमच्याकडे आधार संबंधित काही शंका आहे, तर सर्वात आधी तुम्हाला UIDAI च्या वेबसाइट uidai.gov.in वर जावे लागेल. तेथे तुम्हाला Ask Aadhaar ऑयकॉनवर क्लिक केले जाईल. तुमच्या डिस्प्लेवर Get Started लिहिलेले असेल. यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर चॅटबोट दिसेल. येथे तुम्ही चॅटच्या माध्यमातून तुमच्या शंका विचारु शकतात.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/