बेरोजगारांसाठी खुशखबर ! राज्य सरकारकडून १० लाख नोकऱ्यांची निर्मिती

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने धडाकेबाज निर्णय घेण्यास सुरवात केली आहे. राज्यापुढेच नव्हे तर देशापुढे बेरोजगारीने गंभीर स्वरूप धारण केले आहे. राज्य सरकारने या बेरोजगारांना मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकार एका नवीन योजनेच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणार आहे. चिफ मिनिस्टर एम्पलाॅयमेंट जनरेशन प्रोग्राम ( CMEGP ) म्हणजेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना असं या योजनेचं नाव आहे. या योजनेअंतर्गत पुढच्या ५ वर्षात १० लाख नोकऱ्या निर्माण केल्या जातील. या योजनेअंतर्गत १० हजार अति छोट्या, लहान आणि मध्यम आकाराच्या इंडस्ट्रियल युनिटला प्रत्येकी १५ लाख रुपये दिले जातील. त्याबदल्यात दर वर्षी या उद्योगांकडून २ लाख नोकऱ्या दिल्या जातील.

केंद्र सरकारच्या पंतप्रधान रोजगार निर्मिती या योजनेच्या धरतीवर राज्याने या योजनेची निर्मिती केली आहे. पाच हजार लक्ष्य असणाऱ्या या योजनेत महाराष्ट्रातून १६ हजारांनी अर्ज केलेत.  याचा अर्थ बेरोजगारांची संख्या जास्त आहे. उद्योगखात्यानं मिळवलेल्या माहितीनुसार जवळजवळ ४० लाख बेरोजगार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत बऱ्याच जणांना नोकरीची संधी मिळणार आहे.

सरकारला पुढील ५ वर्षात १ लाख युनिट्स सुरू करायचे आहेत. पहिल्या वर्षात १० हजार युनिट्स सुरू करण्याचं लक्ष्य आहे. तर दुसऱ्या वर्षी २० हजार युनिट्स सुरू करायची आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार यासाठीची भांडवली गुंतवणूक ५० लाख रुपये आहे. राज्य यासाठी ३५ टक्के मदत करेल आणि उद्योगपतींकडून १० टक्के मदत घेतली जाईल. उरलेलं भांडवल बँकेकडून कर्जानं घेतलं जाईल. ही योजना यशस्वी करण्यासाठी अनेक खासगी बँकांशी करार केला आहे. पुढच्या ५ वर्षात या बँकांकडून २हजार कोटींची अपेक्षा आहे. राज्य सरकारनं ३०० कोटींची सोय केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like