डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण : आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचा क्राईम ब्रांचचा अहवाल

मुंबई पोलीसनामा : ऑनलाईन – डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपी तपासात सहकार्य करत नाहीत. तपासात गुन्ह्याशी संबंधित अनेक गोष्टींचा उलगडा होणं अद्याप बाकी आहे. असा अहवाल मुंबई क्राइम ब्रांचने सत्र न्यायालयात सादर केला आहे. क्राइम ब्रांचने त्यांच्या जामीनाला जोरदार विरोध केला आहे.

डॉ. भक्ती मेहेर, डॉ. हेमा अहुजा, डॉ. अंकिता खंडेलवाल यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर याप्रकरणाचा तपास क्राइम ब्रांचकडे देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला होता. दरम्यान आरोपींच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी झाली. सध्या तीनही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांची रिमांड २१ जूनला संपणार आहे. या जामीन अर्जावरील सुनावणी तुर्तास तरी १९ जून पर्यंत तहकुब करण्यात आली आहे.

हा गुन्हा अस्ट्रॉसिटीचा असल्याने त्याची सुनावणी इन कॅमेरा करण्याची मागणी पायल तडवी यांच्या कुटुंबियांनी केली आहे. तसेच न्यायालयाने ही मागणी मान्य करत कोर्ट कर्मचाऱ्यांना व्हिडीओ रेकॉर्डींगची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.

परंतु तांत्रिक अडचणींमुळे सोमवारी रेकॉर्डींग झाले नाही. मात्र आरोपींच्या वकिलांनी खटल्याची सुनावणी व्हिडीओ रेकॉर्डिंगमध्ये होऊ द्या. मात्र जामीन अर्जावरील सुनावणीसाठी रेकॉर्डिंग उपलब्ध होईपर्यंत थांबण्याची गरज नाही. नाही तर आरोपींना अंतरिम जामीन मंजूर करण्यात यावा अशी मागणी केली.

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com) 

रात्री २ विलायची खाऊन १ ग्लास गरम पाणी प्या ; होईल ‘ही’ कमाल

हळदीचे ‘हे’ दोन फेसपॅक वापरून तुम्ही दिसाल तजेलदार

एक कप ग्रीन टी नियमित घेतल्यावर होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे

केस का गळतात? कारणे जाणून करा सोपे घरगुती उपाय