अभिनेता उपेंद्र लिमेयच्या डॉक्टर पत्नीचं ‘कोरोना’च्या लढाईत मोलाचं ‘योगदान’ ! सर्व स्तरातून होतंय ‘कौतुक’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  मराठी इंडस्ट्रीतील फेमस अॅक्टर उपेंद्र लिमये याला आपण सारेच ओळखतो. परंतु त्याच्या पत्नीबद्दल तुम्हाला माहिती आहे का. अनेकांना माहिती नसेल की, उपेंद्रची पत्नी स्वाती ही एक डॉक्टर आहे. विशेष बाब अशी की, कोरोना महामारीच्या या संकटकाळात स्वातीनं मोलाचं योगदान दिलं आहे.

भारत सरकारच्या आयुष मंत्रालयानं अर्सेनिक अल्बम 30 हे होमिओपॅथिक औषध कोरोना होण्यापासून रोखण्यास प्रभावी ठरत आहे असं सांगितलं आहे. यामुळं रोगप्रतिकारक शक्ती वाढते अंसही त्यांनी जाहीर केलं आणि नागरिकांना या औषधाचं सेवन करण्याचा सल्लाही दिला आहे.

स्वाती उपेंद्र लिमये ही एक होमिओपॅथिक डॉक्टर आहे. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या घोषणेला अनुसरून स्वातीनं अर्सेनिक अल्बम 30 हे होमिओपॅथिक औषध तयार केलं आहे. इतकंच नाही तर स्वातीनं हे औषध गोरेगाव आणि मालाड परिसरातील सुमारे 640 कुटुंबांना मोफत वाटलं आहे. याशिवाय तिनं मालाड पोलीस स्टेशनमध्ये सुमारे 252 पोलीस कुटुंबासाठी हे औषध दिलं आहे.

एवढ्यावरच स्वाती थांबली नाही तर येत्या काळात हे औषध मोठ्या प्रमाणावर तयार करण्याचा आणि ते मोफत वाटण्याचा संकल्पही तिनं केला आहे. या मोलाच्या कार्यात तिला पती उपेंद्र लिमये, मुलगी भैरवी, संदीप भोसले, अर्जुन दळवी, आमोद दोशी अशा अनेकांचा सपोर्ट आहे जे तिला मदत करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like