UPI Credit Card Linking | RBI च्या मंजूरीनंतर ‘या’ बँकांच्या क्रेडिट कार्डने होईल यूपीआय पेमेंट, असे करा लिंक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – UPI Credit Card Linking | रिझर्व्ह बँकेने (RBI) डिजिटल पेमेंट (Digital Payment) ला प्रोत्साहन देण्यासाठी या आठवड्यात काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. जूनच्या एमपीसी बैठकीनंतर (RBI MPC Meet June 2022), सेंट्रल बँकेने सांगितले की आता क्रेडिट कार्ड (Credit Card) यूपीआयशी लिंक (UPI Linking) करून पेमेंट केले जाऊ शकते. (UPI Credit Card Linking)

 

आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी एमपीसी बैठकीनंतर सांगितले की यूपीआय प्लॅटफॉर्मवर क्रेडिट कार्ड पेमेंट करण्याची सुविधा ग्राहकांना पूर्वीपेक्षा अधिक पर्याय प्रदान करेल.

 

शक्तिकांता दास यांनी केली ही घोषणा
मात्र, गव्हर्नर दास यांनी यासोबत असेही सांगितले की, यूपीआय सह क्रेडिट कार्ड लिंक करण्याची सुरूवात रुप क्रेडिट कार्ड (RuPay Credit Card) ने होईल. क्रेडिट कार्ड मार्केटमध्ये सध्या मास्टरकार्ड (Mastercard) आणि व्हिसा (Visa) यांचे वर्चस्व असल्याने, बहुतेक वापरकर्त्यांना सध्या यूपीआयद्वारे क्रेडिट कार्ड पेमेंट करण्याची सुविधा मिळणार नाही. (UPI Credit Card Linking)

 

सध्या ही सुविधा फक्त रुपे क्रेडिट कार्ड असलेल्या लोकांनाच मिळणार आहे. सध्या कोणत्या बँका रुपे क्रेडिट कार्ड देत आहेत आणि क्रेडिट कार्ड यूपीएशी कसे लिंक करायचे ते जाणून घेवूयात…

या देत आहेत बँका रुपे क्रेडिट कार्ड

1. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) :
रुपे क्रेडिट कार्ड देण्यात एसबीआयचे नाव प्रथम येते. एसबीआय ’शौर्य एसबीआय रुपे कार्ड’ (Shaurya SBI RuPay Card) आणि ’शौर्य सिलेक्ट एसबीआय रुपे कार्ड’ (Shaurya Select SBI RuPay Card) ऑफर करत आहे.

 

2. पंजाब नॅशनल बँक (PNB) :
पीएनबी सुद्धा दोन रूपे क्रेडिट कार्ड ऑफर करत आहे. ते म्हणजे ’पीएनबी सिलेक्ट कार्ड (PNB RuPay Select Card) आणि पीएनबी प्लॅटिनम रूपे कार्ड (PNB Platinum RuPay Card) आहे.

 

3. बँक ऑफ बडोदा (BoB) :
या सरकारी बँकेच्या पोर्टफोलिओमध्ये बँक ऑफ बडोदा इझी रुपे क्रेडिट कार्ड (Bank of Baroda Easy RuPay Credit Card) आणि बँक ऑफ बडोदा प्रीमियर रुपे क्रेडिट कार्ड (Bank of Baroda Premier RuPay Credit Card) अशी दोन रूपे क्रेडिट कार्ड देखील आहेत.

 

4. आयडीबीआय बँक (IDBI Bank) :
ही बँक आयडीबीआय विनिंग्ज सिलेक्ट कार्ड (IDBI Winnings RuPay Select Card) ऑफर करते.

 

5. युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank Of India) :
ही बँक यूनियन प्लॅटिनम रूपे कार्ड (Union Platinum RuPay Card) आणि यूनियन सिलेक्ट रूपे कार्ड (Union Select RuPay Card) ऑफर करते.

6. सारस्वत बँक (Saraswat Bank) :
सारस्वत बँक प्लॅटिनम रुपे कार्ड (Saraswat Bank Platinum RuPay Card) देते.

 

7. फेडरल बँक (Federal Bank) :
फेडरल बँक रुपे सिग्नेट क्रेडिट कार्ड (Federal Bank RuPay Signet Credit Card) देते.

 

यूपीए अ‍ॅपशी क्रेडिट कार्ड याप्रमाणे लिंक करा

सर्व प्रथम यूपीआय पेमेंट अ‍ॅप उघडा.

प्रोफाईल पिक्चरवर क्लिक करा.

पेमेंट सेटिंग्ज ऑपशनवर जा.

क्रेडिट/डेबिट कार्ड पर्याय निवडा.

कार्ड क्रमांक, व्हॅलिड अप टू डेट, सीव्हीव्ही, कार्डधारकाचे नाव इ. नोंदवा.

सर्व माहिती भरल्यानंतर सेव्ह बटणावर क्लिक करा.

 

Web Title :- UPI Credit Card Linking | rbi allows upi credit card linking these banks are offering service how to link process

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Eknath Khadse | राजकारणात इतिहासजमा झाले म्हणणाऱ्यांना एकनाथ खडसेंचे उत्तर; म्हणाले…

 

Tata Group च्या ‘या’ स्टॉकमध्ये मिळू शकतो 41% शानदार रिटर्न; दमदार बिझनेस आऊटलुकवर BUY रेटिंग; पहा टार्गेट

 

PM Kisan e-KYC | शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! PM किसानची e-KYC करण्यासाठी मुदत वाढवली; जाणून घ्या