SBI UPI Fund Transfer : अकाऊंटमधून पैसे ‘कपात’ झाले अन् व्यवहार नाही झाल्यास करा ‘हे’ काम, होईल फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या एसबीआय योनो लाइट अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना यूपीआय सेवा देते. यात एका वेळी दहा हजार रुपये आणि दिवसात जास्तीत जास्त २५,००० रुपयांची व्यवहार मर्यादा आहे. एसबीआयच्या या सेवेमुळे ग्राहक सहजपणे त्यांचा निधी ट्रान्सफर करू शकतात. परंतु कधीकधी असे होते की निधी ट्रान्सफर अयशस्वी होते. जेव्हा तुमचा एसबीआय यूपीआय फंड ट्रान्सफर अयशस्वी होईल, तेव्हा काय करावे ते जाणून घ्या…

जर तुमच्या खात्यातून पैसे वजा झाले असतील, पण व्यवहार झालेला नाही, तर यूपीआय त्याच वेळी देयकाच्या खात्यात रक्कम परत करते. जर देयकाला ही रक्कम परत मिळाली नाही, तर ग्राहक एसबीआय योनो लाइट अ‍ॅपवरच तक्रार करू शकतो.

एकदा पेमेंट सुरू झाल्यानंतर योनो लाइट एसबीआय अ‍ॅपच्या यूपीआय सुविधांद्वारे हस्तांतरित केलेल्या निधीची देय विनंती थांबवली जाऊ शकत नाही.

तुम्ही अ‍ॅपमधील ‘Payment History’ पर्यायावर तक्रार करू शकता. येथे संबंधित व्यवहार निवडून तुम्हाला ‘raise dispute’ वर जावे लागेल. तुम्ही एसबीआय पर्सनल ऍपमध्ये यूपीआय सुविधेत उपलब्ध असलेल्या “Dispute Status” मॉड्यूलमध्ये स्टेटसची माहिती देखील शोधू शकता.
बँक संकेतस्थळानुसार, सध्या यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

एसबीआय यूपीआय फंड ट्रान्सफरची स्थिती जाणून घेण्यासाठी ग्राहकाला योनो लाइट एसबीआय अ‍ॅपवर लॉग इन करावे लागेल. यानंतर ‘Navigate to UPI’ पर्यायावर जाऊन ‘UPI Payment History’ वर क्लिक करावे लागेल. येथे ग्राहक त्यांच्या निधी हस्तांतरणाची स्थिती माहिती पाहू शकतात.

या पद्धतीनेही ट्रान्सफर करू शकता निधी
जर एसबीआय ग्राहक योनो ऍपवरून निधी ट्रान्सफर करण्यास सोयीस्कर नसतील, तर ते व्हीपीए (Virtual Payment Address) च्या माध्यमातूनही निधी ट्रान्सफर करु शकतात. याशिवाय खाते क्रमांक आणि आयएफएससी कोडच्या मदतीनेही ग्राहक निधी ट्रान्सफर करू शकतात.