UPI Payment Limit | ऑनलाइन पेमेंटवर आता मर्यादा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – UPI Payment Limit | पेटीएम, गुगल पे आणि फोन पे यांसारख्या विविध यूपीआय पेमेंट अ‍ॅप्सवर यूपीआय व्यवहारांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. बँक टू बँक रिअल टाइम हस्तांतर यूपीआय पेमेंट सिस्टिममध्ये होते. त्यामुळे वेगवेगळ्या बँकांनी यासाठी वेगवेगळ्या दैनंदिन व्यवहार मर्यादा निश्चित केल्या आहेत. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (NPCI) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, यूपीआयवरून दररोज जास्तीत जास्त 1 लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार करता येणार आहेत, तर काही लहान बँकांनी त्यांची मर्यादा 25,000 रुपयांपर्यंत निश्चित केली आहे. (UPI Payment Limit)

 

गुगल पे एका दिवसात 10 व्यवहार करण्याची सुविधा देत आहे. फोन पेवर ही व्यवहाराची मर्यादा बँकेनुसार 10 किंवा 20 पर्यंत आहे. यूपीआय पेमेंटसाठी पेटीएम अ‍ॅप खूप लोकप्रिय आहे. या अ‍ॅपवर यूपीआय पेमेंटचे दर दिवसाला ट्रान्सफर लिमिट 1 लाख रुपये आहे. या अ‍ॅपद्वारे एका दिवसात जास्तीत जास्त 20 यूपीआय व्यवहार करू केले जाऊ शकतात. पेटीएमवर यूपीआय पेमेंट लिमीट तासानुसार बदलते. पेटीएमवर एका तासात 20,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम ट्रान्स्फर करू शकत नाहीत. तसेच, प्रत्येक तासाला या अ‍ॅपद्वारे जास्तीत जास्त 5 यूपीआय व्यवहार होऊ शकतात. त्यामुळे आता यूपीआय पेमेंट करणाऱ्यांनी याची नोंद घ्यायची आहे.

 

Web Title :- UPI Payment Limit | gpay phonepe paytm limit set what is rule

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Pimpri Crime | धक्कादायक! बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस ठाण्यातच घेतले पेटवून; पिंपरी चिंचवडमधील घटना

Sanjay Raut | ‘काँग्रेसचे प्रयत्न कमी पडले, गुजरात भाजपकडे’ – संजय राऊत

Congress Leader Nana Patole | “भाजप सर्वकाही उद्योगपतींसाठी करत आहे”; धारावी पुनर्वसन प्रकल्प अदानीला, नाना पटोले यांची टीका