UPI Payment Update | यूपीआय पेमेंटबाबत RBI ची नवीन घोषणा; आता इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – UPI Payment Update | ऑनलाइन व्यवहारासाठी (Online Payment) प्रसिद्ध असलेले युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच यूपीआय (UPI) हे आता अद्ययावत होणार आहे. सर्वांत लोकप्रिय असलेल्या या पेमेंटच्या पद्धतीमुळे ऑनलाइन व्यवहार हातातील फोनवरून करणे सहज सोपे झाले. हे पेमेंट करण्यासाठी आतापर्यंत इंटरनेट (Internet) किंवा वायफायची (WI-FI) गरज होती. त्याशिवाय हे यूपीआय पेमेंट करणे अशक्य होते. आता मात्र आरबीआय Reserve Bank of India (RBI) अशी एक सिस्टीम तयार करू पाहत आहे ज्यामध्ये इंटरनेटशिवाय देखील यूपीआय पेमेंट (UPI Payment Update) करणे शक्य होणार आहे.

यूपीआयच्या मदतीने ऑनलाईन व्यवहार अगदी सोपे झाले असले तरी ह्या पेमेंटमध्ये इंटरनेट महत्त्वाची भूमिका निभावते. इंटरनेट कनेक्शन शिवाय ही स्टिटीम काम करु शकत नाही. मात्र आरबीआय सध्या अशा सिस्टीमवर काम करत आहे, ज्यामुळे इंटरनेटशिवाय पेमेंट करणे शक्य होईल. आरबीआयची (RBI) ही लाइटवेट पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम (Lightweight Payment And Settlement System) आहे. एखादी नैसर्गिक आपत्ती (Natural Calamities) आलेल्या किंवा हिंसाग्रस्त भागात (Violence Area) बऱ्याच वेळा इंटरनेट सुविधा बंद होते. अशा वेळी पैशांचे व्यवहार ठप्प होतात. आपातकालीन परिस्थिती व्यवहार सुरळीत पार पडावे यासाठी ही सिस्टीम तयार करण्यात येत आहे.

आरबीआयने आपल्या वार्षिक अहवालात या सिस्टीमबद्दल (New Payment System) माहिती दिली असून याद्वारे यूजरला मोबाईल नेटवर्कशिवाय ऑनलाईन व्यवहार करता येणार आहेत. ही पेमेंट सिस्टीम ऑपरेट करण्यासाठी काही ठराविक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरची गरज असेल, असे आरबीआय मार्फेत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. तसेच युद्धाच्या परिस्थितीमध्ये ज्याप्रमाणे एक बंकर काम करतं, त्याचप्रमाणे आपत्कालीन परिस्थितीत ही पेमेंट सिस्टीम (Emergency Payment System) काम करेल. कोणत्याही परिस्थितीत व्यवहार थांबणार नाहीत याची ही काळजी घेईल. यामुळे आणीबाणीच्या परिस्थितीत (Emergency Situation) देशाची अर्थव्यवस्था (Economy) रुळावर राहील. अशी माहिती देण्यात आली आहे. (UPI Payment Update)

 

मात्र ही सिस्टीम केवळ आपत्कालीन वेळेस वापरण्यासाठी तयार करण्यात येणार
असल्याने ती इतरवेळी सामान्यांसाठी उपलब्ध नसेल.
केवळ आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये पेमेंटचे इतर मार्ग बंद झाल्यानंतरच ही सिस्टीम वापरता येईल.
ही सिस्टीम कधी लाँच (New System Launch) होणार आहे याबाबत मात्र अहवालात सांगण्यात आलेले नाही.

 

Web Title : UPI Payment Update | RBI’s New Announcement on UPI Payments; Payments can now
be made without internet

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा