UPI Payments on Voice Commands | व्हॉईस कमांडने पेमेंट करू शकणार ग्राहक, UPI मध्ये नवीन फीचर्सचा समावेश

नवी दिल्ली : UPI Payments on Voice Commands | NPCI ने लोकप्रिय पेमेंट प्लॅटफॉर्म UPI बाबत संवादात्मक व्यवहारासह (conversational transactions) अनेक नवीन पेमेंट पर्याय लाँच केले आहेत. (UPI Payments on Voice Commands)

भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हलमध्ये नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे प्रॉडक्ट लाँच करण्याची घोषणा केली. (UPI Payments on Voice Commands)

सर्वात खास प्रॉडक्ट पैकी एक आहे हॅलो! UPI जे यूजर्सला हिंदी आणि इंग्रजीमध्ये अ‍ॅप्स, टेलीकॉम कॉल आणि IoT उपकरणांच्या माध्यमातून व्हॉईस-इनेबल UPI पेमेंट करण्यासाठी सक्षम करेल. म्हणजे आता तुम्ही बोलून सुद्धा UPI पेमेंट करू शकता. हे फीचर लवकरच अनेक इतर प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होईल.

दूसरे फीचर हे आहे
NPCI ने म्हटले की, क्रेडिट लाईन ऑन UPI फॅसिलिटी ग्राहकांना UPI च्या माध्यमातून बँकांकडून पूर्व-मंजूर क्रेडिटपर्यंत अ‍ॅक्सेस करण्यास सक्षम करेल.

त्याचवेळी वापरकर्ते आणखी एक नवीन प्रॉडक्ट LITE X चा सुद्धा वापर करू शकतील.
याचा फायदा हा आहे की, याद्वारे तुम्ही ऑफलाईन सुद्धा पैसे पाठवू शकाल आणि सोबतच पैसे प्राप्त देखील करू शकता.

याशिवाय, कन्व्हेंशनल स्कॅन-अँड-पे मेथड शिवाय,UPI टॅप एंड पे फॅसिलिटी, ग्राहकांना आपले पूर्ण पेमेंट करण्यासाठी
व्यापारी स्थानांवर नियर फील्ड कम्युनिकेशन – (NFC) सक्षम क्यूआर कोडचा वापर करण्याची परवानगी देईल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap News | 9 हजार रुपये लाच घेताना मंडळ अधिकाऱ्यासह खासगी व्यक्ती अँन्टी करप्शनच्या जाळ्यात