वेब सीरिजच्या नावाखाली फसवणूक, पॉर्न साइटवर टाकली मॉडेलची Bold फिल्म

नवी दिल्ली : वृतसंस्था –   मध्य प्रदेशात वेब सीरिज लाँचच्या नावाखाली मुलीचा अश्लील व्हिडिओ बनवून अश्लील साइटवर अपलोड केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये अश्लील फिल्म बनविण्याचे रॅकेट उघडकीस आले असून या प्रकरणात, कास्टिंग डिरेक्टरला ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धामनोड येथील रहिवासी असलेल्या मुलीने सायबर पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, डिसेंबर 2019 मध्ये ब्रिजेंद्र नावाच्या व्यक्तीने तिला वेब सिरीज सुरू करण्याचे आमिष दाखवले आणि आपल्या फार्म हाऊसमध्ये घेऊन गेला. ही महिला इंदूरमध्ये मॉडेलिंग करते. ती महिला तिच्या कास्टिंग डायरेक्टर मित्र मिलिंदसह तेथे आली. बोल्ड मूव्ही सीरिजमध्ये तिला काम देण्याच्या बहाण्याने ब्रिजेंद्रने काही बोल्ड सीन शूट केले. त्याने सांगितले की, त्यातून काही अश्लील कंटेंट हटवून काही सीन ठेवत ते ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करेन. त्यानंतर ती महिला चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पहात राहिली. हा चित्रपट प्रदर्शित झाला पण अश्लील वेबसाइटवर, तेही सर्व अश्लील आणि बोल्ड दृश्यांसह. तिच्या एका ओळखीच्या व्यक्तीने त्या महिलेला याबद्दल सांगितले, पण तोपर्यंत 4 लाख लोकांनी ते पाहिले होते.

घाबरून तिने ब्रिजेंद्र व तिच्या मित्राशी संपर्क साधला पण त्यांनी त्या युवतीकडे दुर्लक्ष केले. यावर महिलेने कॉस्टिंग डायरेक्टरसह 5 जणांविरूद्ध तक्रार दाखल केली. मिलिंदची चौकशी सुरू आहे, तर ब्रिजेंद्र फरार आहे.