UPSC 2019 Result : अंतिम परीक्षेत प्रदीप सिंह पहिला तर महाराष्ट्राची नेहा भोसले देशात पंधरावी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यूपीएससी 2019 च्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये प्रदीप सिंह देशात पहिला आला आहे. UPSC civiel Service साठी झालेल्या या परीक्षेत देशभरातून 829 महत्वाकांक्षी युवक युवती निवडले गेले आहेत. जतीन किशोर आणि प्रतिभा वर्मा अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. महाराष्ट्राची नेहा भोसले ही देशात पंधराव्या रँकवर आहे. तर अभिषेक सराफ आठव्या रँकवर आहे. UPSC 2019 चा निकाल www.upsc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे.

यूपीएससी ने सप्टेंबर 2019 मध्ये घेण्यात आलेल्या नागरी सेवांच्या लेखी परीक्षेचा निकालाच्या आधारे फेब्रुवारी-ऑगस्ट 2020 मध्ये घेण्यात आलेल्या वैयक्तिक मुलाखतीवर आधारीत निवडलेल्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली आहे. यंदा या परीक्षेत एकूण 829 उमेदवारांची निवड झाली आहे. दरवर्षी लाखो उमेदवार ज्यांना आयएएस, आयपीएस अधिकारी बनण्याची इच्छा असलेले तरुण-तरुणी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देतात. ही परीक्षा देशातील सर्वात आव्हानात्मक स्पर्धा परीक्षा मानली जाते. यंदा या निवड झालेल्या उमेदवारांपैकी 304 जनरल कॅटेगिरीतील, 78 EWS, 251 OBC, 129 अनुसूचित जाती आणि 67 अनुसूचित जमाती कॅटेकिरीतील आहेत.

असा पहा निकाल
– UPSC 2019 चा निकाल www.upsc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.
– Final Result – Civil Services Examination, 2019 या लिंकवर क्लिक करा.
– या पीडीएफमध्ये तुमचे नाव आणि रजिस्ट्रेशन नंबर पहा
– पीडीएफ डाऊनलोड करून तुम्ही त्याची प्रिंट काढू शकता.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या या सेवा परीक्षेतून आएएस, आयपीएस आणि आएफसी, भारतीय टपाल सेवा, यूपीएससी नागरी सेवांद्वारे भारतीय व्यापार सेवा यासह इतर सेवांसाठी निवड केली जाते. ही परीक्षा तीन टप्प्यांमध्ये घेतली जाते. यामध्ये प्रारंभिक, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे तीन टप्पे असतात. मुख्य परीक्षा व मुलाखतीच्या कामगिरीच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाते.