UPSC 2021 Results Ranking | यूपीएससीचा निकाल जाहीर ! यंदा मुलींचा डंका; श्रुती शर्मा भारतातून पहिली, पहिल्या 5 मध्ये 4 मुली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – UPSC 2021 Results Ranking | केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC परीक्षा (UPSC Result 2021) चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा पहिल्या तीन टाॅपर्समध्ये मुलींनी आपली बाजी मारली आहे. श्रुती शर्मा (Shruti Sharma) या तरुणीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याचबरोबर द्वितीय आणि तृतीय क्रमांकावर देखील मुलीनींच आपल्या यशाची रेघ ओढली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये एकूण 749 उमेदवार यशस्वी झाले आहेत. (UPSC 2021 Results Ranking)

गतवर्षी केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) नागरी सेवा परीक्षा 2020 ची मुख्य मुलाखत फेरी 2 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर 2021 या कालावधीत घेण्यात आली होती. त्यानंतर 24 सप्टेंबर 2021 रोजी अंतिम निकाल जाहीर केला. यंदा मुलाखतीची प्रक्रिया 26 मे 2022 रोजी संपली. त्यामुळे UPSC CSE 2021 चा अंतिम निकाल आज (सोमवारी) जाहीर करण्यात आला आहे.

या दरम्यान, उमेदवारांचे वैयक्तिक गुण निकालानंतर पंधरा दिवसांनी जाहीर करण्यात येणार आहेत. तसेच, यूपीएससीच्या (UPSC) अधिकृत संकेतस्थळावर upsc.gov.in येथे निकाल पाहता येणार असल्याचं आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.

पहिल्या 10 टाॅपर्सचे नावे –

– श्रुती शर्मा (Shruti Sharma)
– अंकिता अग्रवाल (Ankita Agarwal)
– गामिनी सिंगल (Gamini Single)
– ऐश्वर्या वर्मा (Aishwarya Verma)
– उत्कर्ष द्विवेदी – (Utkarsh Dwivedi)
– यक्ष चौधरी (Yaksha Chaudhary)
– सम्यक सा जैनी (Samyak Sa Jaini)
– इशिता राठी – (Ishita Rathi)
– प्रीतम कुमार – (Pritam Kumar)
– हरकीरत सिंह रंधावा – (Harkirat Singh Randhawa)

Web Title : UPSC 2021 Results Ranking | upsc cse 2021 result declared at upsc gov in shruti sharma stood first in all india rank UPSC 2021 Results Ranking

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री?
राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही;
आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा
आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल –
विक्रम कुमार, महापालिका आयुक्त