UPSC ची तयारी करणार्‍या ‘आकांक्षा’ने केली गळफास घेऊन केली आत्महत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  – UPSC | एका तरुणीने दिल्लीतील राजेंद्र नगर (Rajendra Nagar, Delhi) भागात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही तरूणी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेची तयारी करत होती. युपीएससी प्राथमिक फेरीची रविवारी होणारी परीक्षा ती देणार होती, तत्पूर्वीच तिने आपले जीवन अशा धक्कादायक प्रकारे संपवले आहे.

 

आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आकांक्षा मिश्रा (Akanksha Mishra) असून ती मुळची उत्तर प्रदेशातील भादोही येथील राहणारी आहे. UPSC स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आकांक्षा याच वर्षी दिल्लीत आली होती. येथील जुन्या राजेंद्र नगर (Rejendra Nagar, Delhi) परिसरात ती भाड्याच्या घरात ऑक्टोबर महिन्यापासून राहात होती.

 

सकाळी 11.50 वाजता आकांक्षा सोबत राहणार्‍या मुलींच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर तातडीने पोलिसांना कळवण्यात आले.
तत्पूर्वी या मुलींनी 11 वाजताच्या सुमारास आकांक्षाला पाहिले होते.

 

मध्य दिल्लीच्या सहायक पोलीस आयुक्त श्वेता चौहाण (Assistant Commissioner of Police Shweta Chauhan) यांनी सांगितले की,
आकांक्षाने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. तिने खोलीचा दरवाजा आतून बंद केला होता.
घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट (Suicide Note) सापडलेली नाही. दरम्यान, तिच्या पालकांना याबाबत कळवले आहे.

Web Title :-  UPSC | Akanksha mishra who was preparing for UPSC, committed suicide by strangulation in rajendra nagar of delhi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Cruise Drug Case | NCP नेते नवाब मलिकांच्या आरोपावर NCB ने दिले उत्तर, म्हणाले – ‘आम्ही ‘या’ कारणामुळं 3 नव्हे 6 लोकांना सोडले होते’

Waqf Board Land Scam Case | वक्फ बोर्डाची जमीन लाटणाऱ्या अप्पर जिल्हाधिकाऱ्याला अटक; प्रचंड खळबळ

Baby Born Without Face | आश्चर्यकारक ! चेहर्‍याशिवाय झाला मुलीचा जन्म, डॉक्टर म्हणाले – ‘जगणार नाही आणि मग झाला ‘हा’ चमत्कार’