UPSC Calendar 2023 | यूपीएससीने जारी केले कॅलेंडर, जाणून घ्या केव्हा होईल कोणती परीक्षा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – UPSC Calendar 2023 | केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC ने विविध परीक्षांचे वेळापत्रक (UPSC Calendar 2023) प्रसिद्ध केले आहे. परीक्षांचे हे वेळापत्रक अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आले आहे. वेळापत्रकानुसार, UPSC नागरी सेवा पूर्वपरीक्षा 28 मे 2023 रोजी होणार आहे. त्याच वेळी, नागरी सेवा परीक्षा (UPSC Civil Services Exam Notification) ची अधिसूचना 1 फेब्रुवारी 2023 रोजी जारी केली जाईल. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 फेब्रुवारी 2023 आहे.

 

नागरी सेवा मुख्य परीक्षा 2023 ही 15 सप्टेंबरपासून घेतली जाईल आणि परीक्षा 5 दिवस चालेल. त्याच वेळी, भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षा 2023, 26 नोव्हेंबरपासून आयोजित केली जाईल. माहितीनुसार, भारतीय अभियांत्रिकी सेवा (पूर्वपरीक्षा) परीक्षा 2023, 19 फेब्रुवारी रोजी होणार आहे आणि संयुक्त भू – वैज्ञानिक (मुख्य) परीक्षा 2023, 24 जून रोजी होणार आहे.

 

याशिवाय नॅशनल डिफेन्स अकादमी (NDA) आणि नेव्हल अकादमी (NA) ची परीक्षा 16 एप्रिल रोजी होणार आहे.
यूपीएससी परीक्षेचे कॅलेंडर दरवर्षीप्रमाणे प्रसिद्ध करण्यात आले आहे, जेणेकरून UPSC इच्छुकांना पुढील वर्षीच्या परीक्षांची माहिती मिळू शकेल. UPSC पूर्वपरीक्षा 2022 परीक्षा 5 जून 2022 रोजी होणार आहे.

 

UPSC Exam Calendar 2023 कसे डाउनलोड करावे

स्टेप 1 : सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा.

स्टेप 2 : वेबसाइटवर दिलेल्या Annual Calendar 2023 च्या लिंकवर क्लिक करा.

 

Ramdas Athawale On BJP-MNS Alliance | ‘भाजपला मनसेची गरज नाही’; रामदास आठवले यांनी स्पष्टच सांगितलं

 

स्टेप 3 : यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक PDF दिसेल.

स्टेप 4 : आता ती तपासा आणि डाउनलोड करा.

 

Web Title :- UPSC Calendar 2023 | upsc calendar 2023 check dates of civil services ias ips cisf nda cds exam

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा