UPSC कडून ‘सिव्हिल सर्व्हिस 2019’ च्या मुलाखतीचं वेळापत्रक जारी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्ही UPSC चा अभ्यास करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. संघ लोकसेवा आयोगाने (UPSC) सिविल सेवा परीक्षा 2019 च्या मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मुख्य परिक्षेतनंतर आयोगाद्वारे मुलाखतीचे आयोजन करण्यात येते. UPSC मुख्य परिक्षेत पात्र ठरणारे उमेदवार या मुलाखतीत सहभागी होतील.

UPSC ची पूर्व परिक्षा पास झालेल्या उमेदवारांची 20, 22, 28 आणि 29 सप्टेंबर 2019 ला मुख्य परीक्षा पार पडली होती. त्यानंतर आता आयोगाकडून मुलाखत 2019 चे आयोजन करण्यात आले असून या मुलाखतींना 17 फेब्रुवारी 2020 पासून सुरुवात होणार आहे.

UPSC ने सिविल सेवा मुख्य व्यक्तिमत्व चाचणीचे वेळापत्रक देखील जाहीर केले आहे. UPSC च्या अधिकृत वेबसाईटवर आयोगाकडून यासंबंधित वेळापत्रक तपासण्याचे उमेदवारांना आवाहन करण्यात आले आहे. https://www.upsc.gov.in/sites/default/files/Interview-CSM-2019-Engl.pdf या लिंकवर जाऊन उमेदवार व्यक्तीमत्व चाचणीच्या वेळापत्रकांची माहिती घेऊ शकतात.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like