UPSC मध्ये क्रिकेट वर्ल्डकपविषयी विचारण्यात आला ‘हा’ प्रश्‍न, IASसाठीच्या ‘या’ उमेदवारानं दिलं ‘असं’ उत्‍तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यूपीएससी परीक्षेत सर्वात शेवटच्या टप्प्यात मुलाखतीमध्ये डिटेल्ड एप्लीकेशन फॉर्म सर्वात महत्वाची भूमिका पार पाडत असतो. तुमचा हा फॉर्म तुमच्याविषयी खूप काही सांगून जातो. मुलाखतीच्या आगोदर उमेदवारांकडून हा फॉर्म भरून घेतला जातो. यामध्ये तुमचे शिक्षण, वैयक्तिक माहिती, तुमची आवड, नावड, त्याचबरोबर हॉबी तसेच एकूण व्यक्तिमत्वाविषयी माहिती असते. मुलाखतीच्या वेळी याची एक प्रत मुलाखत घेणाऱ्यांकडे असते. मुलाखतीत सर्वात जास्त प्रश्न तुमच्या या फॉर्ममधूनच विचारण्यात येतात.

अशाच प्रकारे एका उमेदवाराला या मुलाखतीदरम्यान क्रिकेट वर्ल्ड कप २०१९ विषयी एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्या उमेदवाराने आपल्या हॉबी सेक्शनमध्ये क्रिकेटचा उल्लेख केला होता. यूपीएससी मुख्य परीक्षेच्या वेळी त्याने या फॉर्ममध्ये त्याने आपल्याला क्रिकेट आवडत असल्याचे लिहिले होते. त्यानंतर त्याला प्रश्न विचारण्यात आला कि, तुम्ही या वर्ल्डकपमध्ये कोणत्या संघाला सपोर्ट करत आहात, त्याचबरोबर कोण जिंकलेलं तुम्हाला आवडेल ?. २०१८ मध्ये फेब्रुवारी – मार्च महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेत हा प्रश्न विचारण्यात आता होता. तर वर्ल्डकप या वर्षी  मे आणि जून महिन्यात पार पडला. बिहारच्या सुमित कुमार याला हा प्रश्न विचारण्यात आला होता. मागील वर्षी झालेल्या परीक्षेत त्याने ५३ वि रँक मिळवली होती.

अशी पार पडली मुलाखत

या मुलाखतीत त्याला विचारण्यात आले कि, तुम्ही या वर्ल्डकपमध्ये कोणत्या संघाला सपोर्ट करत आहात, त्याचबरोबर कोण जिंकलेलं तुम्हाला आवडेल ?. त्यावर त्यांनी उत्तर दिले होते कि, हो मी वर्ल्डकप पाहण्यासाठी फार उत्सुक असून भारतीय संघाने हि स्पर्धा जिंकावी अशी माझी इच्छा आहे. त्यानंतर पुढे त्याला विचारण्यात आले कि, अन्य कोणत्या संघांवर तुमचे लक्ष आहे. त्यामधील कोणता संघ हि स्पर्धा जिंकू शकतो. त्यावर त्याने उत्तर दिले कि, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड देखील या स्पर्धेत विजेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत. इंग्लंडमधील खेळपट्ट्या धावा होणाऱ्या आहेत. त्याचबरोबर त्याला कंपीटीशन कमीशन ऑफ इंडिया विषयी देखील प्रश्न विचारण्यात आले. याची देखील त्याने उत्तम प्रकारे उत्तरे दिली.

पहिल्यांदा देखील पास केली आहे परीक्षा

२०१७ मध्ये झालेल्या परीक्षेत देखील त्याने ४९३ वी रँक मिळवली होती. त्यावेळी त्याला डिफेंस एस्टेट सर्विस कॅडर मिळाले होते. मात्र त्याला आयएएस बनायचे असल्याने त्याने पुन्हा परीक्षा दिली आणि दुसऱ्या प्रयत्नात यश मिळवले.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like