‘UPSC’चे वेळापत्रक जाहीर ; ‘या’ आहेत परिक्षेच्या तारखा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – युनियन पब्लिक सर्विस कमीशनचे (युपीएससी) यंदाचे 2020 चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. यंदाची परिक्षेची सुरुवात इंजिनिअरिंग सर्विस प्रिलिम्स परिक्षेने होणार आहे. याची अर्ज करण्याची प्रक्रिया 25 सप्टेंबर 2019 पासून सुुरु होईल तर 15 ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल. 5 जानेवारी 2020 ला ही परिक्षा पार पडेल. यासंबंधित युपीएससीने ही माहिती जाहीर केली आहे. युपीएससीच्या वेबसाईटवर यासंबंधित माहिती देण्यात आली आहे.

सिविल प्रिलिम्स आणि इंडियन फारेस्ट सर्विस प्रिलिम्सचे आयोजन 31 मे 2020 रोजी करण्यात आली आहे. त्यासाठीचे नोटीफिकेशन 12 फेब्रुवारीला जाहीर करण्यात येईल तर 3 मार्च 2020 पर्यंत अर्ज करण्याची अंतिम तारीख असेल.

सिविल सर्विसेस मेन्सची परिक्षा 18 सप्टेंबर 2020 रोजी होईल. तर इंडियन फॉरेस्ट सर्विस मेनची परिक्षा 22 नोव्हेंबर रोजी होईल. इंजिनियरिंग सर्विस मेन्सची परिक्षा 28 जूनला पार पडेल तर एनडीए व एनए च्या परिक्षा 2 – 6 सप्टेंबरच्या दरम्यान पार पडतील. कंबाइंड जियो साइंटिस्टची मेन्सची परिक्षा 27 जूनला पार पडेल.

युपीएससीची परिक्षा देणाऱ्या परिक्षार्थीसाठी ह्या नोटीफिकेशन संबंधित अधिक माहिती युपीएससीने संकेत स्थळावर उपलब्ध करुन देिली आहे. त्यावर आवश्यक ते मार्गदर्शन देखील युपीएससीकडून विद्यार्थांना करण्यात आले आहे.