UPSC Exam | ‘सारथी’ संस्थेच्या 21 विद्यार्थ्यांचे UPSC परीक्षेत घवघवीत यश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC Exam) शुक्रवारी निकाल जाहीर केला असून यामध्ये पुण्यातील सारथी (pune sarathi) संस्थेतील 21 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादीत केले आहे. सारथी संस्थेमध्ये मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या गटातील होतकरु विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC Exam) परीक्षेच्या तयारीसाठी विद्यावेतन देऊन दिल्ली व पुणे येथील नामांकित कोचिंग संस्थेत प्रक्षणाची संधी उपलब्ध करुन दिली होती.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC Exam) मुलाखतीच्या तयारीकरीता विशेष प्रशिक्षण नियोजन करुन तज्ज्ञांमार्फत झूम मिटिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्यात आले होते.
तसेच सारथी संस्थेमध्ये अभिरुप मुलाखतीचे नियोजन करुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्यात आले होते.
पुणे सारथी प्रायोजित यूपीएससी प्रशिक्षण उपक्रमातील 21 विद्यार्थ्यांची अंतीम यादीत निवड झाली आहे.
विनायक नरवाडे (Vinayak Narwade) या विद्यार्थ्याने गुणवत्ता यादीत 37 वा क्रमांक प्राप्त केला आहे.
21 विद्यार्थ्यांमध्ये 4 मुलींचा समावेश आहे.

सारथी संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर (Ajit Nimbalkar) यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच यशस्वी विद्यार्थ्यांनी उत्तम प्रशासन करुन या देशाच्या विकासात आपला ठसा उमटावा अशा शुभेच्छा व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे (Ashok Kakade) यांनी दिल्या आहेत.

यशस्वी विद्यार्थ्यांचे नाव आणि कंसात रँक

विनायक कारभारी नारवाडे (37), गौरव रविंद्र साळुखे (182), प्रतिक अशोक धुमाळ (183), प्रथमेश अरविंद राजशिर्के (236), आनंद अशोक पाटील (325), सागर भारत मिसाळ (352), सुरज भाऊसाहेब गुंजाळ (353), अनिल रामदास मस्के (361), अर्पिता अशोक ठुबे (383), अमोल सुरेशराव मुरकुट (402), अनिकेत अशोक फडतरे (426), राकेश महादेव अकोलकर (432), ओंकार मधुकर पवार (455), नितीन गंगाधर पुके (466), प्रणव विनोद ठाकरे (476), रणजीत मोहन यादव(513), माधुरी भानुदास गरुड (561), पूजा अशोक कदम (577), हर्षल भगवान घोगरे (614), रविराज हरिश्चंद्र वडक (633), सायली अशोक गायकवाड (641)

हे देखील वाचा

Ajit Pawar | ‘…कशी तुझी जिरवली आता भर 100 चं’, अजित पवारांची फटकेबाजी

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 3,723 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  UPSC Exam | Success of 21 students of ‘Sarathi’ institute in UPSC examination

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update