UPSC : लोकसेवा आयोगाकडून परीक्षांची तारीख ठरली, वेळापत्रक जाहीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून यूपीएससी प्रिलिम्स (पूर्व परीक्षा) आणि मेन (मुख्य) परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, आज आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा आणि मुलाखतीच्या तारखा ठरवण्यासंदर्भात बैठक पार पडली. त्यानुसार, युपीएससी २०२० च्या पूर्व परीक्षांची तारीख जाहीर करण्यात आली असून, ४ ऑक्टोबर पासून या परीक्षांना सुरुवात होणार आहे.

याबाबत लोकसेवा आयोगाने आपल्या अधिकृत वेबसाईट वरुन युपीएससीच्या पूर्व परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्याआधी ही परीक्षा ३१ मे रोजी होणार होती. पण कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर, आता अनलॉक १ सुरु झाल्यानंतर या परीक्षांची तारीख जाहीर करण्यात आली.

कोरोना संसर्गाचा परिणाम देशातील सर्वच शैक्षणिक संस्था आणि स्पर्धा परिक्षांवरती झाला. ऐन परीक्षांच्या काळातच या संसर्गाने भारतात शिरकाव केला त्यामुळे वार्षिक परिक्षांवरही त्याचा परिणाम पाहायला मिळाला. मात्र, अद्यापर्यंत या परीक्षांबाबत कोणत्याही प्रकारचा निर्णय झाला नाही. दरम्यान, केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ३१ मे २०१९ रोजी पूर्व परीक्षा घेण्यात येणार होती. पण लॉकडाऊन मुळे ती पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर २ जून रोजी ही परीक्षा होणार असल्याचं आयोगाने जाहीर केलं. पण परिस्थितीत सुधारणा न झाल्यानं आयोगाने अनिश्चित काळासाठी परीक्षा पुढे ढकलली. या संदर्भात शुक्रवारी (५ जून) आयोगाची बैठक पार पडली. त्यात तारीख निश्चित करण्यात आली. त्यानुसार, ४ ऑक्टोबर पासून युपीएससीच्या पूर्व परीक्षांना सुरुवात होणार आहे. तर, ८ जानेवारी २०२१ पासून मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच, युपीएससीच्या फॉरेस्ट विभागाच्या पूर्व परीक्षांचीही घोषणा करण्यात आली असून, २८ फेब्रुवारी २०२१ रोजी ही परीक्षा होणार आहे. २०१९ मधील युपीएससी परीक्षांच्या मुलाखती २० जुलै पासून सुरु होणार आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like