UPSC Final Result 2020 | सिव्हिल सर्व्हिसेस 2020 चा रिझल्ट लागला, शुभम कुमार ने केले टॉप, टीना डाबीच्या बहिणीने 15वी रँक मिळवली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  UPSC Final Result 2020 | यूपीएससीने सिव्हिल सर्व्हिसेस 2020 चा फायनल रिझल्ट (UPSC Final Result 2020) जारी केला आहे. या परीक्षेत शुभम कुमारने टॉप केले आहे. यूपीएससीनुसार, सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत जागृती अवस्थी आणि अंकिता जैन यांनी अनुक्रमे दूसरे आणि तिसरे स्थान मिळवले आहे. या परीक्षेत 761 उमेदवार पास झाले आहेत ज्यामध्ये 545 पुरुष आणि 216 महिलांचा समावेश आहे. आयएएस अधिकारी आणि 2015 बॅचची टॉपर टीना डाबीची बहिण रिया डाबी सुद्धा UPSC ची परीक्षा पास झाली आहे. रिया डाबीने 15वी रँक मिळवली आहे.

टॉपर शुभम कुमारने आयआयटी मुंबईतून B Tech (सिव्हिल इंजिनियरिंग) केले आहे. तो बिहारच्या कटिहारचा राहणारा आहे.
जागृती अवस्थीने MANIT भोपाळमधून बी टेक (इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग) केले आहे.

सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षांचे आयोजन दरवर्ष यूपीएससी तीन टप्प्यात करते, ज्यामध्ये प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीचा समावेश आहे.
या परीक्षांच्या माध्यमातून भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस – IAS), भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस- IFS) आणि भारतीय पोलीस सेवा (आयपीएस – IPS)
सह अनेक इतर सेवांसाठी उमेदवारांची निवड होते.

प्राथमिक परीक्षा मागच्या वर्षी 4 ऑक्टोबरला आयोजित केली गेली होती. या परीक्षेसाठी 10 लाख 40 हजार 60 उमेदवारांनी अर्ज केला होता आणि 4,82,770 लोक परीक्षेला बसले होते.
यापैकी 10 हजार 564 उमेवार मुख्य परीक्षा पास झाले.
मुख्य परीक्षा याच वर्षी जानेवारीत आयोजित करण्यात आली होती. यापैकी 2,053 उमेदवार मुलाखतीसाठी उत्तीर्ण झाले.

 

Web Title : UPSC Final Result 2020 | upsc declares the final result 2020 shubham kumar tops civil services exam

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Thackeray Government Big Decision | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे खुली

Ajit Pawar | स्विमिंग पूलमध्ये खेळाडूंबरोबरच नागरीकांनाही आता मुभा (व्हिडीओ)

Pune Crime | जाहिरातीच्या 35 फूट उंचीच्या होर्डिंगवरुन तरुणाने मारली उडी, पुण्यातील घटना