UPSC : NDA/NA 2019 चा अंतिम निकाल जाहीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) 2019 मध्ये झालेल्या नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA) आणि नेव्हल अकॅडमी-2 (NA) परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. आयोग्याच्या अधिकृत संकेतस्थळावर upsc.gov.in वर हा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

निकालाच्या परिपत्रकात यूपीएससीने सांगितले आहे की, एकूण 662 उमेदवार एनडीए-एनए परीक्षेत यशस्वी झाले आहेत. मेरिट लिस्ट 17 नोव्हेंबर 2019 रोजी झालेली लेखी परीक्षा आणि सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड द्वारे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्ससाठी घेण्यात आलेल्या मुलाखती यांच्या आधारे तयार करण्यात आली आहे. मेडिकल परीक्षेच्या निकालाला गुणवत्ता यादी तयार करताना ग्राह्य धरण्यात आलेले नाही.

या निवड प्रक्रियेच्या आधारे उमेदवारांना एडीएच्या 144 व्या कोर्स आणि एनएच्या 106 व्या कोर्समध्ये प्रवेश मिळणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांची निवड जिन्मदाखला, शैक्षणिक प्रमाणपत्र आणि अन्य कागदपत्रांच्या पडताळणीपर्यंत प्रोव्हिजनल मानली जाईल.

एनडीए एनए परीक्षेच्या निकालाची लिंक

https://upsc.gov.in/sites/default/files/FR-NDA-II-2019-Engl.pdf?_ga=2.222569883.1023892012.1599806364-675937767.1585387056