UPSC उमेदवारांच्या मुलाखतीच्या तारखा पुढे ढकलल्या, पुढील आदेशापर्यंत स्थगिती

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – देशात कोरोनामुळे खळबळ उडली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण निर्णय घेत आहेत. कोरोनाच्या याच संकटामुळे आता केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (UPSC) उमेदवारांची होणारी मुलाखत पुढे ढकलण्यात आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून लोकसेवा आयोगाच्या मुख्य परिक्षेत पास झालेल्या उमेदवारांची मुलाखत आयोजित करण्यात आली होती परंतु या मुलाखतीच्या तारखा पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत.


लोकसेवा आयोगाच्या मुख्य परिक्षेत (2019) पास झालेल्या उमेदवारांच्या मुलाखतीचे आयोजन 23 मार्च ते 3 एप्रिल पर्यंत करण्यात आले होते. परंतु कोरोना व्हायरसच्या संकटामुळे मुलाखतीच्या या तारखा स्थगित करण्यात आल्या आहेत. येत्या काही दिवसात उमेदवारांना नव्या तारखांची माहिती देण्यात येईल असे लोकसेवा आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 200 वर पोहोचली आहे. तर मृत्यांचा आकडा 5 वर गेला आहे. राजस्थानात कोरोनाने 5 व्या रुग्णांचा बळी घेतला. दिल्लीत देखील एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता लोकसेवा आयोगाकडून हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.