सहाय्यक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी, अभियंत्यांसह विविध पदांवर निघाली भरती, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये नोकर भरती निघाली आहे. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनने (यूपीएससी) अनेक वेगवेगळ्या पदासाठी रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक प्राध्यापक, अभियंत्यासह, आर्किटेक्ट यासह अनेक पदावर सरकारी नोकरी मिळण्याची संधी आहे. यासाठी यूपीएससीने आपल्या अधिकृत वेबसाईट upsc.gov.in वर एक अधिसूचना जारी केली आहे. पदांच्या भरतीसाठीची प्रक्रिया सुरु झाली आहे.

पदांची माहिती
वैद्यकीय अधिकारी/संशोधन अधिकारी – 36 पदे
सहाय्यक अभियंता – 3 पदे
विशेषज्ञ ग्रेड 3 सहाय्यक प्राध्यापक – 60 पदे
वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी – 21 पदे
आर्किटेक्ट (गट अ) – 1 पद
एकूण पदांची संख्या – 121

अर्ज माहिती
या पदासाठी इच्छुक उमेदवारांना यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
ऑनलाईन अर्ज करण्याची प्रारंभी तारीख – 24 जुलै 2020
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 13 ऑगस्ट 2020
अर्ज छापाईची अंतिम तारीख – 14 ऑगस्ट 2020
अर्ज फी – एससी, एसटी, महिला आणि अपंग उमेदवारांसाठी अर्ज विनामुल्य आहे. इतर सर्व प्रकारच्या उमेदवारांना 25 रुपये अर्ज फी भरावी लागेल

आवश्यक पात्रता
वेगवेगळ्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी मागवण्यात आली आहे. या सूचनेमध्ये आपल्याला सविस्तर माहिती मिळेल. कमाल वयोमर्यादा देखील सर्व पदांसाठी स्वतंत्रपणे निश्चित केली गेली आहे.
वैद्यकीय अधिकारी – 35 वर्षे
सहाय्यक अभियंता – 30 वर्षे
सहाय्यक प्राध्यापक – 40 वर्षे
वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी – 35 वर्षे
आर्किटेक्ट – 40 वर्षे